लोकशाहीर डाँ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन च्या वतीने अभिवादन
लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अभिवादन(
अकलूज(प्रतिनिधी)
साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
अकलूज येथील लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने अकलूजमधील विविध मंडळांना भेटी देऊन त्या मंडळातील सदस्यांना लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देऊन लोकशाहीर डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांना महाराष्ट्र युवक प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भोसले यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे माळशिरस तालुका अध्यक्ष हेमंत कांबळे तालुका उपाध्यक्ष पांडुरंग चव्हाण तालुका सरचिटणीस दयानंद कांबळे तालुका युवक सरचिटणीस तुषार केंगार अकलूज शहराध्यक्ष शिवाजी खडतरे तालुका संपर्कप्रमुख रोहिदास तोरणे तालुका उपकार्याध्यक्ष अनिल तोरणे शहर खजिनदार शिवाजी कांबळे आकाश गायकवाड आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते