solapur

ब्रिटीशकालीन भाटगर धरण भरले 18,540 वेगाने पाण्याचा विसग्र

ब्रिटीशकालीन भाटघर धरण भरले१८,५४० क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग

अकलूज(प्रतिनिधी)

भोर तालुक्यात मागील पंधरा दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी सुरू असल्याने शुक्रवार सकाळी ११ वाजता ब्रिटीशकालीन भाटघर धरण १०० टक्के भरल्याने धरणाचे ४५ स्वयंचलित दरवाजातून १८ हजार ५४० क्युसेक्स पाण्याचा नीरा नदीत विसर्ग सुरू करण्यात आला आहे.पुणे जिल्ह्यातील सर्वात जास्त २४ टीएमसी पाणीसाठा असणारे भोर तालुक्यातील भाटघर धरण आहे. गेल्यावर्षी २० सप्टेंबरला धरण पूर्ण क्षमतेने भरले होते.

गावांना सतर्कतेचा इशारा—

धरणाला एकूण ८१ दरवाजे असून ४५ स्वंयचलित, ३६ अस्वंयमचलित दरवाजे आहेत. धरणातून अधिक पाणी सोडण्यात आल्यामुळे नदी काठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. शंभर टक्के धरण भरल्याने वेळवंडी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे. अशी माहिती देण्यात आली.मात्र, यावर्षी धरण दीड महिना लवकर भरले. धरणाच्या टप्प्याटप्याने ४५ स्वयंचलित दरवाजातून १८ हजार ५४० क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नीरा नदीत सुरू आहे. यामुळे नदीकाठच्या गावांनी सतर्कता बाळगावी असे आव्हान जलसंपदा विभागाने केले आहे भाडगर धरण क्षेत्रात मागील पंधरा दिवसापासून पावसाचा जोर कायम आहे त्यामुळे धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ झाली आहे.

———————————————————-

आलेल्या पुरामुळे नागरिकांना झळ बसली. त्या पार्श्वभूमी भाटघर, निरादेवघर धरणाच्या पाणी पातळीवर पाटबंधारे विभाग, प्रशासन लक्ष ठेवून आहे. दोन्ही धरणे पूर्ण क्षमतेने भरली आहे, त्यामुळे नागरिकांना दक्ष राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. –

राजेंद्र कचरे उपविभागीय अधिकारी

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button