आँलिम्पिक कांस्य पदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसाळे कुटुंबीयांचे सर्व स्तरातून अभिनंदन
ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता नेमबाज स्वप्निल कुसाळे कुटुंबीयांचे सर्व स्तरातून अभिनंदन
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
पॅरिस येथे सुरू असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत वैयक्तिक नेमबाजीत 50 मीटर रायफल स्पर्धेत थ्री पोझिशनमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील कांबळवाडीचा सुपुत्र स्वप्निल कुसाळे याने कांस्य पदकाला गवसणी घातली आहे.स्वप्नील कुसाळे यांनी भारताला कांस्य पदक मिळवून दिल्याबद्द्ल त्यांचे वडील सुरेश कुसाळे व आई अश्विनी कुसाळे यांचा कोल्हापूर जनता दलाचे जिल्हा अध्यक्ष वसंतराव पाटील, कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशनचे माजी सचिव ॲड.विजय ताटे-देशमुख यांचे वतीने पुष्पगुच्छ देऊन अभिंनदन करणेत आले.
स्वप्नील कूसाळे हे कोल्हापूर जिल्हा मधील राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी गावचा सुपुत्र आहे.जेमतेम एक हजार लोकसंख्या असलेल्या गाव महाराष्ट्र राज्यात २००६ साली संत गाडगे बाबा ग्राम स्वच्छता अभियान स्पर्धेमध्ये प्रथम पारितोषिक विजेते गाव आहे. स्वप्नीलचे वडिल घोटवडे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणुन नोकरी करतात,स्वप्नील चुलते प्राथमिक शाळामध्ये शिक्षक आहेत तसेच स्वप्नीलची आई कांबळवाडी ग्रामपंचायत येथे विद्यमान सरपंच म्हणुन कार्यभार पार पाडत आहेत. स्वप्नीलचे आई वडिलांनी खुप कष्टातून आपल्या मुलास घडवले आहे.कोल्हापुरात ७२ वर्षांनी खाशाबा जाधव यांचे नंतर ऑलिंपिक पदक प्राप्त झाले तसेच स्वप्नील हा ऑलिंपिक पदक विजेता दुसरा महाराष्ट्रीयन आहे.कुटुंबीयांचे अभिनंदन करीत असताना स्वप्नीलचे वडिलांनी या पदापर्यंत गवसणी घालने करिता आलेल्या अडचणी,कष्ट सांगितले. स्वप्नील यांचे उतुंग यशाबद्दल, तसेच जिंकले विविध मेडल बद्द्ल लहान मुलांना प्रोत्साहन,प्रेरणा मिळत आहे.यावेळी मधुकर पाटील,सुरेश पाटील,कु देवेंद्र पाटील,कु.वेदश्री व विरश्री ताटे-देशमुख,सप्नील कुसाळे यांचे सर्व कुटुंबीय,ग्रामस्थ हजर होते.