solapur
जनसेवा संघटनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत शिंदे यांचे निधन

जनसेवा संघटनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत शिंदे यांचे निधन
संचार वृत्त अपडेट
संग्रामनगर (प्रतिनिधी)
महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेचे जेष्ठ नेते चंद्रकांत आप्पा शिंदे उर्फ सी.बी.आप्पा यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.ते ८१ वर्षांचे होते.त्यांच्या पश्चात पत्नी,१ मुलगा,२ मुली,सूना जावाई,नातवंडे असा परिवार आहे.सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशचे अनेक वर्षे चेअरमन पद संभाळले होते.
लोकनेते स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांचे एक निष्ठावंत सहकारी व कार्यकर्ते म्हणून त्यांची सोलापूर जिल्हात ओळख होती. जनसेवा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांनी दुःख व्यक्त केले. त्यांच्या जाण्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.