निमा व होमिओपॅथी संघटनेच्या वतीने मेंदू आजारावरील व्याख्यानाचे आयोजन

निमा व होमिओपॅथी संघटनेच्या वतीने मेंदू आजारावरील व्याख्यानाचे आयोजन
संचार वृत्त अपडेट
संग्रामनगर (केदार लोहकरे)
माळशिरस तालुक्यातील बीएचएमएस व बीएएमएस डॉक्टरांसाठी सीएनएस हॉस्पिटल सोलापूर यांच्या वतीने मोंदूच्या आजारावरील उपचार या विषयावर मार्गदर्शन या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या प्रसंगी डॉ प्रसन्न कासेगावकर प्रख्यात मेंदूरोग सर्जन यांनी मेंदूचे इमर्जन्सी ऑपरेशन करावी लागणे या विषयावर आणी अकलूजचे डॉ. विरेश नष्टे मेंदूरोग तज्ञ् यांनी जी बी सनरोमी या आजारावर मार्गदर्शन केले.या कार्यशाळेसाठी तालूक्यातील बहुसंख्य महिला आणी पुरुष डॉक्टर्स उपास्थित होते.
या वेळी तालुक्यातील आय.एम.ए.,निमा संघटना बीडीएस आणी होमिओपॅथी डॉक्टरांची पाल्य ज्यांनी नीट जी अशा परीक्षांमध्ये विशेष प्रविण्य संपादन केले आहे त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.सुधीर पोफळे,डॉ.प्रशांत निंबाळकर,डॉ.शबाना शेख, डॉ.रुपाली धाईंजे यांनी केले
आभार प्रदर्शन होमिओपॅथीचे अध्यक्ष डॉ.अभिजीत राजेभोसले यांनी केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निमा संघटनेचे अध्यक्ष डॉ.अमोल माने,डॉ.विद्या एकतपुरे,डॉ.वैष्णवी शेटे,डॉ. अभिजीत राजेभोसले आणी दोन्ही संघटनांचे पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले.