अकलूज येथे अजित दादा पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

अकलूज येथे अजित दादा पवार यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा
संचार वृत्त अपडेट
अकलूज येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा ६६ वा वाढदिवस अकलूज येथे विविध उपक्रमाने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
अकलूज येथे राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) गटाच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयातील गोरगरीब माता,भगिनींना व रूग्णांना फळे वाटप राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे जेष्ठ नेते तथा सोलापूर जिल्हा परिषदेचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे माजी जि.प.सदस्य अशोक दादा गायकवाड,राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते किरणजी भोसले,अकलूज शहर अध्यक्ष राजीव गायकवाड, माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राहुल ढेरे-पाटील,वैद्यकीय अधिकारी डॉ.सौ.मिसाळ,सुनील गायकवाड,अरविंद पगारे, सोमनाथ भोसले,डॉ.राजेंद्र मोरे, आरोग्य सेविका भालेराव सिस्टर, एखंडे सिस्टर, सोनवणे सिस्टर, श्रुतिका सिस्टर,ताटे सिस्टर, सरवदे सिस्टर,अमोल ब्रदर व सीमा मावशी यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.