श्रावण सोमवार निमित्त देवदर्शन घेऊ या लाल परी संगे
श्रावण सोमवार निमित्त देवदर्शन घेऊ या लाल परीसंगे
संग्रामनगर दि.५ (केदार लोहकरे यांजकडून)
तब्बल ७१ वर्षानंतर श्रावण महिना सोमवार पासून सुरु होत असून श्रावण मासाची सांगता देखील सोमवारीच होत आहे.या आलेल्या दुर्मिळ योगाच्या अनुषंगाने अकलूज आगरामार्फत पूर्ण महिनाभर (ऑगस्ट) देवदर्शनासाठी मागणीप्रमाणे बस देण्यात येणार आहे.श्रावण महिन्यात भक्तगणांना देवदर्शनाचा लाभ महामंडळाच्या लाल परीने घेता यावा यासाठी नियोजन करण्यात आले आहे. शिखर शिंगणापूर,अष्टविनायक गणपती दर्शनासह इतर ठिकाणच्या देवदर्शनाचा लाभ भक्तगणाना घेता येणार आहे.
श्रावण महिन्यात भक्तगणांना देवदर्शनाचा लाभ घेता यावा यासाठी विविध ठिकाणी मागणीप्रमाणे स्वतंत्र बस धावणार आहेत.अकलूज आगारातून देवदर्शनासाठी विविध ठिकाणी धावणाऱ्या बसेस व तिकीट दर (अंदाजे) पुढीलप्रमाणे १) अष्टविनायक दर्शन बस फूल तिकीट १८००/- हाफ तिकिट ९००/- २) शनिशिंगणापूर व जवळपासचे देवदर्शन बस फूल तिकीट १३०५/- हाफ तिकिट ६५५/- ३) त्र्यंबकेश्वर व इतर देवदर्शन बस फूल तिकीट १७४०/- हाफ तिकिट ८७०/- ४) भीमाशंकर दर्शन बस फुल तिकीट ९००/- हाफ तिकीट ४५०/- ५) गणपतीपुळे दर्शन बस फुल तिकीट १३०५/- हाफ तिकिट ६५५/- ६) साडेतीन शक्तीपीठ दर्शन बस फूल तिकीट २७००/- हाफ तिकिट १३५०/- ७) शेगाव गजानन महाराज दर्शन बस फूल तिकीट १७४०/- हाफ तिकिट ८७०/- ८) गाणगापुर दर्शन बस फुल तिकीट ७८०/- हाफ तिकिट ३९०/- ९) गोंदवले औदुंबर कोल्हापूर दर्शन बस फूल तिकीट ८७०/- हाफ तिकिट ४३५/- १०) लोणार शेगाव आनंदसागर दर्शन बस फुल तिकीट १३५०/- हाफ तिकिट ६७५/- अशाप्रकारे आगरामार्फत देवदर्शनासाठी मार्ग निश्चित करण्यात आलेले असून भाविकांच्या मागणीप्रमाणे बदल हवा असल्यास करुन देण्यात येईल.बुकिंग करीता व दर्शन बसच्या नियम व अटींसाठी प्रत्यक्ष आगारात येऊन खालील यात्रा प्रमुख यांना भेटण्याचे अथवा संपर्क करण्याचे आवाहन आगार व्यवस्थापक यांनी केले आहे. यात्रा प्रमुख १) श्री सोनवलकर ९८८१३९३४७८.२) श्री रंदवे ९६३७०८०००६, ८७६६९१४२९२,३) श्री पिसे ९७६३५६५७६०,४) श्री लंगोटे ९९२३०८१५५९ यांच्याशी संपर्क साधावा.
या दरामध्ये केवळ प्रवास खर्च समाविष्ट आहेत.तसेच या प्रवासाकरीता रा.प.नियमाप्रमाणे सर्व सवलती लागू आहेत.ग्रुप बुकिंग व महिला बचत गट यासाठी थेट गावातून बस उपलब्ध होईल त्यासाठी नियम व अटी लागू राहणार आहेत.सदर दर्शन बससाठी किमान ४२ प्रवाश्यांचा ग्रुप असणे आवश्यक असून ग्रुप तयार असल्यास ग्रुप च्या मागणीनुसार तारीख देण्यात येईल.
*मागील वर्षीप्रमाणे या वर्षीही नियोजन*
मागील वर्षी श्रावण महिन्यात अशाच देवदर्शन बस सेवा सुरु करण्यात आली होती. त्यास अकलूज पंचक्रोशीतील भाविकानी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता.त्या नुसार याही वर्षी असेच नियोजन केले असून या किफायतशीर व सुरक्षित प्रवासाची हमी देणाऱ्या दर्शन बस सेवेचा लाभ भक्तगणांनी घ्यावा असे आवाहन अकलूजचे आगार व्यवस्थापक प्रमोद शिंदे यांनी केले आहे.