सतीश शांताबाई कुंडलिक कचरे यांना आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त

सेवारत्न सतीश शांताबाई कुंडलिक कचरे यांचे सलग दुसरे राज्यस्तरीय रेकॉर्डसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ 9001 :2015 मानांकन प्राप्त
संग्रामनगर (केदार लोहकरे यांजकडून)
सेवारत्न सतीश शांताबाई कुंडलिक कचरे यांचे सलग दुसरे राज्यस्तरीय रेकॉर्डसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे आयएसओ 9001 :2015 मानांकन प्राप्त
मंडल कृषी अधिकारी अकलूज कार्यालय (तालुका-माळशिरस) यांना प्राप्त झाले आहे.आपले सर्वांचे,आपले,आमचे,माझे मंडल कृषी अधिकारी अकलूज या कार्यालयास आपले सर्वांचे सहकार्य,मदत,सल्ला,पाठबळ, पाठीवरील हात यामुळे आंतरराष्ट्रीय दर्जाचे ९३६ देशात काम कार्यरत असलेले व हजार पेक्षा जास्त देशात मान्यताप्राप्त आंतरराष्ट्रीय स्टॅंडर्ड आयएसओ 9001 :2015 आंतरराष्ट्रीय मानांकन दिनांक २५ डिसेंबर २०२४ ते २४ डिसेंबर २०२७ या कालावधीसाठी प्राप्त झाले आहे.सेवारत्न सतीश शांताबाई कुंडलिक कचरे यांचे मंडल कृषी अधिकारी नातेपुते नंतर मंडल कृषी अधिकारी अकलूज हे सलग दुसरे राज्यस्तरीय कृषी विभागात रेकॉर्डसह आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन प्राप्त मिळविणारे कृषी अधिकारी ठरले आहे.ही आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त करण्यासाठी नातेपुते व अकलूज मंडल मधील सर्व आधिकारी,कर्मचारी व वरिष्ठ अधिकारी पत्रकार,वर्ताहार यांचा खारीचा वाटा आहे.
या मानांकनासाठी डिजिटल QR कोड सह डिजिटल इंडिया,डिजिटल महाराष्ट्र, डिजिटल कृषी विभाग व डिजीटल मंडळ याचाच एक भाग म्हणून QR कोड द्वारे मार्गदर्शन, मौखिक व लेखी मार्गदर्शन, शेतकरी अभिप्राय,कृषी ग्रंथालय,कृषी वस्तू संग्रहालय, अदयावत शेतकरी माहिती व प्रशिक्षण कक्ष,नगण्य प्रलंबितता, फ्लो चार्ट,माहिती चार्ट,अभिलेख वर्गीकरण,सुसज्ज बैठक व्यवस्था,प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यास आईच्या नावासह नाव निर्देशित प्लेट,सर्वांना आयकार्ड,सर्वधर्म समभावसाठी एक गणवेश,मंडळ कृषी अधिकारी कार्यक्षेत्रातील ३६ गावांचा अद्यावत मुख्य व सूक्ष्म अन्नद्रव्ये सुपीकता निर्देशांक चार्ट,अधिकारी कर्मचारी यांचे गावभेटीचे दिवस सह सूक्ष्म नियोजन,कृषी व संलग्न बाबीतील आपत्कालन व्यवस्थापनासाठी QR कोडद्वारे मार्गदर्शन,कृषी तंत्र,मंत्र,योजना, प्रचार,प्रसार,प्रसिद्धी,शेतकरी व शेतकरी कुटुंब सेवार्थ कार्य,राज्य व केंद्रशासन धोरण व योजना यांची उत्कृष्ट अंमलबजावणी,कार्यालय रंगरंगोटी इत्यादी अनेक बाबींची अंमलबजावणी नंतर सर्वेक्षण व अंकेक्षण,ॲडीटवर आधारित आंतरराष्ट्रीय दर्जाचा हा मानांकन मिळवण्याचा मान या कार्यालयास प्राप्त झाला आहे. आमचे ब्रिद आपल्या देशात देशाला नंदनवन करायचे असेल तर शेतकऱ्यांस सर्व प्रकारच्या कृषि विद्या शिकविल्या पाहिजेत-महात्मा फुले हे सर्व शक्य सबका साथ सबका प्रयास और सबका विकास मुळे प्रत्यास आले आहे धन्यवाद !! हम सब बनाऐ बेहतरीन से बेहतर !!