solapur

2022-23 चा दुसरा हप्ता तातडीने द्यावा: राजू शेट्टी

2022-23 चा दुसरा हप्ता तातडीने द्यावा: राजू शेट्टी

संचार वृत्त

2022 23 या गळीत हंगामातील तुटलेला उसाचे दुसऱ्या हप्त्याचे पैसे देण्यासाठी तातडीने मान्यता देऊन मुख्य सचिव यांचे अध्यक्षतेखालील ऊस दर नियंत्रण समितीची बैठक लावून कारखान्यांना मान्यता देण्याची मागणी राजू शेट्टी यांनी केली.
राज्यातील साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू करण्यासाठी साखर कारखानदार प्रशासन व शासन स्तरावर प्रयत्न सुरू झाले आहेत मात्र सरकारने ऊस उत्पादक शेतकरी वाहतूकदार तसेच कारखाना कामगार व मजुरांचे प्रश्न भिजत ठेवले असल्याने यंदाचा दळीत हंगाम सुरू करण्यास अडथळे निर्माण होणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजीव शेट्टी यांनी साखर आयुक्त कुणाल खेमनार यांच्याशी झालेल्या बैठकीदरम्यान निदर्शनास आणून दिले. केंद्र व राज्य सरकारला सर्वाधिक महसूल व रोजगार निर्मिती देणाऱ्या साखर उद्योगाकडे फक्त साखर कारखानदाराचे हित डोळ्यासमोर ठेवून राज्य सरकार निर्णय घेऊ लागले आहे यामुळे राज्यातील ऊस उत्पादक शेतकरी वाहतूकदार तसेच कारखाना कामगार व मजुरांच्या प्रश्नांची गुंतागुंत वाढू लागली आहे गत दोन गळीत हंगामात साखर इथे लोन व उपपदार्थाचे भाव वाढल्याने देशातील व राज्यातील साखर उद्योगाला चांगले दिवस आले आहेत साखर कारखान्याकडे एफआरपी आला करून पैसे शिल्लक राहू लागले आहेत मात्र सरकार व कारखानदार संगणमत करून सदरचे पैसे बुडविण्याचे कटकारस्थान करू लागले असल्याचे साखर आयुक्त यांच्या निदर्शनास आणून दिले गत हंगामातील एफ आर पी पेक्षा जास्त पैसे देण्यासाठी राज्यातील सर्व कारखानदारांनी वार्षिक सर्वसाधारण सभेत ठराव करणे गरजेचे असून मे महिन्यातच स्वाभिमानीने याबाबत साखर आयुक्त यांच्याकडे केलेल्या मागणीनुसार साखर आयुक्त यांनी लेखी पत्राद्वारे सर्व कारखान्यांना कळविले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button