solapur

माळीनगर कारखान्याचे रोलर पूजन संपन्न.

संचार वृत्त

संग्रामनगर  (केदार लोहकरे यांजकडून)
माळीनगर येथील दि सासवड माळी शुगर फॅक्टरीच्या चालू सिझन २०२४-२५ च्या गळीत हंगामासाठी सज्ज होत असलेल्या कारखान्यातील मिल रोलरचे पूजन शुगरकेन विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन अमोल ताम्हाणे यांच्या हस्ते विधिवत पूजा करून करण्यात आले.
या कार्यक्रमासाठी कारखान्याचे चेअरमन राजेंद्र गिरमे,मॅनेजिंग डायरेक्टर सतीश गिरमे,होलटाईम डायरेक्टर परेश राऊत,संचालक निळकंठ भोंगळे, निखिल कुदळे,नंदकुमार गिरमे त्याचप्रमाणे एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी अजय गिरमे,व्हा.चेअरमन नितीन इनामके,संचालक पृथ्वीराज भोंगळे,दिलीप इनामके,शुगर केनचे संचालक जयवंत चौरे, भागधारक दीपक गायकवाड, सिकंदर जगताप आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी चेअरमन राजेंद्र गिरमे यांनी बोलताना सांगितले की,राज्य शासनाकडून सहकारी साखर कारखान्यांना कर्ज,अनुदान दिले जाते.परंतु खाजगी साखर कारखान्यांना कुठलेही कर्ज अनुदान मिळत नाही.त्यामुळे आम्हाला संचालक मंडळाच्या प्रॉपर्टी गहाण ठेवून कर्ज काढावे लागते आणि असे कर्ज काढतच आम्हाला कारखाना चालवावा लागतो आहे .त्यामुळे काही वेळेस कामगारांचे पगार उसाचे पेमेंट देण्यास मागेपुढे होते परंतु कामगार सभासदांचे सहकार्य असल्याने ऊस सिझन यशस्वी करत आलो आहोत.ते पुढे म्हणाले येणाऱ्या सीझनमध्ये ऊस कमी आहे.त्यामुळे सीझन अडचणीचा ठरणार आहे. उन्हाळ्यात तापमान खूप होते. त्याचा ऊस लागणीवर आणि त्याच्या वाढीवर परिणाम झाला आहे.तसेच अद्याप पाऊस नसल्याने आडसाली उसाच्या लागणी पूरेशा न होता सुरू ऊसाच्या लागणीस करणे शेतकरी पसंत करत आहेत.सुरु ऊस लागवडीत उत्पन्न कमी निघते.परेश राऊत म्हणाले सभासद, कामगार यांच्या सहकार्याने नेहमी प्रमाणे आपण येणारा गळीत हंगाम ऊसाचे क्षेत्र कमी असले तरी जास्तीत जास्त गाळप करून यशस्वी करणार आहोत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button