अजित पवार यांची ताकद पाठीशी असल्याने अकलूज चा विकास नक्की होईल एकच वादा अजित दादा,धवलदादा ; मौलाना शेख

अजित पवार यांची ताकद पाठीशी असल्याने अकलूज चा विकास नक्की होईल एकच वादा अजित दादा,धवलदादा ; मौलाना शेख
संचार वृत्त अपडेट
आज सर्वत्र नगरपरिषद नगरपंचायतीच्या निजवडणुकाची रणधुमाळी चालू असून प्रत्येक पक्ष आपापल्या पक्षाचा उमेदवाराचा प्रचार करत आहे 30 नोव्हेंबर हा प्रचाराचा शेवट दिवस असून प्रत्येक उमेदवार प्रचारात मग्न आहे त्या अनुषंगाने अकलूज नगर परिषद निवडणूक 2025 ची रणधुमाळे चालू असून राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आणि डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली अकलूज नगर परिषद निवडणूक साठी स्वतंत्र पॅनेल उभा केला असून 13 प्रभागासाठी 26 उमेदवार हे निवडणूक रिंगणात असून नगराध्यक्ष पदासाठी ॲड. दिव्या आणि सुधीर रास्ते या निवडणूक रिंगणात असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या घड्याळ चिन्हांचा प्रचार आघाडीवर असून सर्वच उमेदवार लढतीसाठी सज्ज आहेत.
आज राज्यात अकलूज नगर परिषदेची सर्व चर्चा चालू असून जेव्हा जेव्हा अकलूज मध्ये हिंदू-मुस्लीम चा विषय येईल तेव्हा तेव्हा या चा प्रॉब्लेम अलीकडच्या काळात डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांनी सॉल केला असून मुळातच शक्यतो 99% मोहिते पाटील परिवारामुळे हिंदू मुस्लिम चा प्रॉब्लेम निर्माण होत नाही आणि ते डोकेही वर काढत नाही आज अकलूज परिसरात नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र कै. प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या कार्याचा आणि नेतृत्वाचा आजही बोलबाला आहे अशा नेतृत्वाच्या सुपुत्राला जनतेने एकदा संधी द्यावी असे माझे मत असल्याचे मौलाना तय्यब आली यांनी म्हटले आहे
स्वर्गीय प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्याच पावलावर पाऊल टाकत डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी जे रंजले गांजले गोरगरीब जनता आहे त्यांच्यावर अन्याय झाला तर ते तातडीने त्याचे निवारण करतात ही एक जमेची बाजू असून आज पर्यंत डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांनी केलेल्या कार्याची पोच पावती म्हणून अकलूज आणि पंचक्रोशीतील मतदारांनी एकदा त्यांना विकास कामे करण्याची संधी द्यावी शिवाय यांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची ताकद असल्याने निश्चितच या अकलूजचा विकास होईल यात काही शंका नाही आणि तसा शब्दही अजित दादांनी दिल्याने अकलूज कर नागरिकांच्या आशा पल्लवी झाले आहेत तरी अकलूज मधील सर्व मतदारांना मी विनंती करतो की एक वेळ धवल दादांना संधी दिली तर नक्कीच संधीचे सोने करणार एकच वादा अजित दादा धवलदादा ही काळा दगडावरची रेघ आहे असे ते म्हणाले.




