चंद्रप्रभू स्कूलची सिंधुदुर्ग समुद्र सफारी

चंद्रप्रभू स्कूलची सिंधुदुर्ग समुद्र सफारी
संचार वृत्त अपडेट
चंद्रप्रभू इंग्लिश मिडीयम स्कूल, नातेपुतेची शैक्षणिक सहल सिंधुदुर्ग मालवण तारकर्ली देवबाग अशी काढण्यात आलेली होती. संस्थेचे चेअरमन नरेंद्र गांधी, सेक्रेटरी विरेंद्र दावडा, सर्व कमिटी मेंबर सह मुख्याध्यापिका शितल ढोपे यांच्या मार्गदर्शनाखाली काढण्यात आली होती. यामध्ये इयत्ता ५ वी ते ९ वी तील शेकडो विद्यार्थ्यांनी शैक्षणिक सहलीत सहभाग घेतला होता.चंद्रप्रभू स्कूलच्या सहली नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण, अभ्यासपूर्ण आणि देदीप्यमान असतात. यावर्षी सुद्धा विद्यार्थ्यांच्या आंगी अभियांत्रिकी व स्थापत्य शिक्षणाची पायभूत प्रात्यक्षिके दाखवण्यासाठी सिंधुदुर्ग जलदुर्ग, राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांचा पुतळा तसेच सागरी जलदुर्गांची निर्मिती त्यासंबंधी स्थापत्य तंत्रज्ञान याविषयीच्या अभ्यासासाठी तसेच समुद्र संपत्ती, जैव विविधता, कोकणी संस्कृती आणि ऐतिहासिक भौगोलिक विविधता इत्यादी घटकांचा अभ्यासाठी सिंधुदुर्ग मालवण तारकर्ली देवबाग ही ठिकाणे निवडली होती.

यावेळी विद्यार्थ्यांनी इंडियन नेव्ही स्थापित छत्रपती शिवाजी महाराज पूर्णाकृती पुतळा राजकोट, सिंधुदुर्ग किल्ला माहिती, रॉक गार्डन, चिवला किनारा, तारकर्ली किनारा, त्सुनामी आयलँड, देवबाग, डॉल्फिन पॉईंट, जयगणेश मंदिर, मालवण बंदर आणि मार्केट इत्यादी ठिकाणी भेटी दिल्या.
यावेळी विद्यार्थ्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्यासमोरील दांडी किनाऱ्यावर आधुनिक वॉटर स्पोर्टस अँक्टिव्हिटी केल्या यामध्ये जेटस्की, बंपर राईड आणि बनाना राईड सह त्सुनामी आयलँड आणि देवबाग बोट राईड केली.

चंद्रप्रभू स्कूल च्या विद्यार्थ्यांनी समुद्रावरील साहसी सफारी करून आपल्या धाडसाची प्रात्यक्षिके दाखवली. चंद्रप्रभू स्कूलच्या सहलीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये साहस आणि अभ्यास आदी गुण वाढीस लागतात. यामुळे पालक वर्गातून सहलीच्या आयोजनाचे कौतुक होत आहे.सदर शैक्षणिक सहलीचा इतिवृत्तांत संजय वलेकर सर यांनी दिला.



