येत्या विधानसभेला स्थानिक बौद्ध किंवा मातंग समाजाला प्रतिनिधित्व देण्याची आग्रही मागणी
माळशिरस तालुक्यातील मोहिते पाटील यांच्या सामाजिक राजकीय वाटचालीत येथील मागासवर्गीय समाजाचे मोठे योगदान राहिले आहे
येत्या विधानसभेला स्थानिक बौध्द किंवा मातंग समाजाला प्रतिनिधित्व देण्याची आग्रही मागणी
संचार वृत्त
श्रीपुर(बी.टी.शिवशरण ज्येष्ठ पत्रकार)
येत्या विधानसभा निवडणुकीत माळशिरस साठी स्थानिक बौध्द किंवा मातंग समाजातील उमेदवारालाच प्राधान्य द्यावे अशी मागणी माळशिरस तालुका सकल मागासवर्गीय समाजाने केली आहे मोहिते पाटील नेतृत्व सक्षम व भक्कम आहे तालुक्यात मोहिते पाटील हीच सामाजिक राजकीय वैचारिक ताकद आहे मोहिते पाटील हेच पक्ष हीच ताकद राहिली आहे मोहिते पाटील घराण्यावर गेली पंच्याहत्तर वर्षे या समाजाने प्रेम केले आहे त्यांना साथ दिली आहे मोहिते पाटील परिवाराला सर्व पातळ्यांवर योगदान दिले आहे सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे पासून ते विद्यमान खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांचे पर्यंत बौध्द समाज मातंग समाज यांनी त्यांना राजकीय मदत केली आहे माळशिरस तालुका राखीव मतदारसंघ झाला त्या राखीव जागेवर मुंबई मध्ये वास्तव्य करणारे स्वर्गीय हनुमंत डोळस यांना दोन टर्म व गेल्या पंचवार्षिक ला बीड येथील राम सातपुते यांना विधानसभेची संधी दिली आहे त्यावेळी मोहिते पाटील हे सांगतील ते व ठरवतील त्याला स्थानिक मागासवर्गीय समाजाने साथ दिली आहे मात्र दोन हजार चोवीस ला माळशिरस तालुक्यात बाहेरील व उपरा तसेच मागासवर्गीय म्हणून कोणताही संबंध नसलेल्या अनाहुत व्यक्तीला उमेदवारी देऊ नये स्थानिक उमेदवार तोही बौद्ध किंवा मातंग समाजातील व्यक्तीलाच उमेदवारी देऊन या वेळी त्याला आमदार करण्यासाठी मोहिते पाटील घराण्यांनी नेतृत्वाने सहकार्य करावे अशी आग्रही जोरदार मागणी मागासवर्गीय समाजाने केली आहे या वेळी कोणत्याही परिस्थितीत माळशिरस तालुक्यातील स्थानिक तोही बौद्ध किंवा मातंग समाजातीलच उमेदवार आमदार झाला पाहिजे यासाठी तालुक्यातील फुले शाहू आंबेडकर लोकशाहिर अण्णाभाऊ साठे विचारांना बांधील असलेल्या हजारो कार्यकर्त्यांनी तालुक्यात बैठक चर्चा व सामाजिक राजकीय परिवर्तन अभियान सुरू केले आहे गेल्या पंचाहत्तर वर्षांनंतर माळशिरस तालुक्यातील बौध्द किंवा मातंग समाजातील व्यक्तीला आमदार बनण्याची संधी मिळाली आहे त्यांना सहकार्य करण्याचे औदार्य व सौजन्य मोहिते पाटील नेतृत्वाने केले आहे जिल्ह्यात राज्यात तिकडे काही का वातावरण असेना पण तालुक्यात मोहिते पाटील यांनाच मदत सहकार्य या समाजाने केले आहे त्यामुळे संविधानाच्या चौकटीत राखीव जागेवर स्थानिक मागासवर्गीय उमेदवारांना प्राधान्य देऊन त्यांना आमदार बनण्याची संधी मिळाली आहे त्यांना सहकार्य करावे अशी जोरदार मागणी व उठाव झाला आहे मोहिते पाटील यांनीही गेल्या पंच्याहत्तर वर्षे या समाजाने दिलेल्या सहकार्याची परतफेड करण्यासाठी पुढे येऊन मोठ्या मनाने साथ द्यावी अशी मागणी होत आहे