लोकनेते मोहनराव पाटील सर्वसामान्यातील लोकमान्य नेतृत्व
संचार वृत्त
बी.टी.शिवशरण(ज्येष्ठ पत्रकार)
माळशिरस पंचायत समितीचे सलग अकरा वर्षे सभापती पद भूषविलेले एकमेव नेते मोहनराव पाटील ऊर्फ तात्या यांची उद्या पुण्यतिथी आहे त्यानिमित्ताने त्यांच्या कारकिर्दीचा घेण्यात आलेला हा अल्पसा प्रयत्न बोरगाव ता माळशिरस येथील स्वर्गीय मोहनराव पाटील हे रांगडे व्यक्तीमत्व सर्वसामान्य लोकांत बहुजन व मागासवर्गीय समाजातील गरजू उपेक्षित वंचित दुर्लक्षित घटकांना न्याय देण्यासाठी व लोककल्याणकारी योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केलेले लोकप्रिय सभापती म्हणून माळशिरस तालुक्यातील प्रत्येक गावात सभापती मोहन तात्या म्हणून आजही आदराने नाव घेतले जाते सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील यांचे ते विश्वासू कट्टर समर्थक कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते अत्यंत धिप्पाड शरीरयष्टी पांढरे शुभ्र मलमली धोतर पांढरा नेहरू शर्ट कडक कोच असलेली टोपी पायात कोल्हापुरी चप्पल या मराठमोळ्या खानदानी वेशात तात्या ग्रामीण रंगढंगातील बहारदार पुढारी शोभायचे बोरगाव येथील कै व्यंकटराव ऊर्फ अण्णासाहेब पाटील त्यांना सर्व पंचक्रोशीत अण्णासाहेब पाटील म्हणून आदराने बोलले जात त्यांचे पोटी चार मुले त्यातील मोहनराव तात्या हे ज्येष्ठ चिरंजीव होते या घराण्याची सामाजिक राजकीय जडणघडण व सामाजिक चळवळीचे क्षेत्र गोरगरीब दिनदलित व बहुजन समाजाच्या विकासासाठी त्यांच्या कल्याणासाठी कार्यरत रहाणे याला त्यांनी प्राधान्य दिले अण्णासाहेब पाटील यांना पंचक्रोशीतील सर्वजण दादा म्हणत ते हजरजबाबी व विनोदी स्वभावाचे होते त्यांच्या कडे वक्तृत्व शैली होती अत्यंत सहज व हृदयांत भिडणारे भाषण करत मार्मिक भाष्य करत सभेत बोलताना ते राजकारण समाजकारण व काही अनिष्ट बाबींवर नेमकं वर्मावर बोट ठेवून उपस्थित श्रोत्यांना मनमुराद हसवत त्यांना एकुण चार मुले ज्येष्ठ मोहनराव वसंतराव अँड प्रकाशराव व पंजाबराव पाटील अशी कर्तबगार मुले वसंतराव पाटील हे कुस्ती खेळत ते शेती करत ते राजकारणात आले नाहीत मात्र अँड प्रकाशराव पाटील व पंजाबराव पाटील हे स्थानिक व तालुका जिल्हा पातळीवर राजकीय क्षेत्रात कार्यरत राहिले पंजाबराव पाटील हे बोरगाव ग्रामपंचायतीचे बावीस वर्षे सरपंच होते अँड प्रकाशराव पाटील पंचायत समिती उपसभापती जिल्हा परिषद सदस्य सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक उपाध्यक्ष सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हा चेअरमन व वकील बार असोसिएशनचे पदाधिकारी व अन्य क्षेत्रात ते सक्रिय राहिले आहेत अँड प्रकाशराव पाटील यांनी आपल्या वैचारिक व अभ्यासू भाषणांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे कै मोहनराव पाटील यांच्या पश्चात त्यांच्या घराण्याचा सामाजिक राजकीय वारसा ते चालवत आहेत त्यांच्या मोठ्या परिवाराला एकत्रित ठेवण्याची मोठी जबाबदारी त्यांनी उचलली आहे या सर्व पार्श्वभूमीवर बोरगावचे नांव विकासात्मक व प्रगतीपथावर जिल्ह्यात पोहचवण्याची कर्तबगारी मोहनराव पाटील यांनी त्यांच्या कामातून केली आहे अत्यंत साधा व करारी स्वभाव विनम्र भाव गोरगरिबांना मदतीला धावून जाणे शैक्षणिक व रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी शासकीय पातळीवरून प्रयत्न व मदत मिळवून दिली बोरगाव परिसर श्रीपूर परिसरातील अनेक गरजू होतकरू सुशिक्षित बेरोजगारांना पंचायत समिती जिल्हा परिषद सहकारी साखर कारखाना यामध्ये नोकर्या मिळवून दिल्या आहेत त्यामुळे अनेक कुटुंबे स्थिरस्थावर झाली आहेत मोहनराव पाटील व त्यांच्या पश्चात आता अँड प्रकाशराव पाटील यांनी मोहिते पाटील परिवार यांचे घराण्याशी तीन पिढ्या संबंध जपले आहेत अनेक. अडचणी संकटे आली राजकीय स्थित्यंतरे झाली पण मोहिते पाटील यांच्याशी एकनिष्ठ राहिले आहेत मोहनराव पाटील यांना जाऊन पस्तीस वर्षे होत आहेत पण त्यांच्या पश्चात या पाटील घराण्याने दरवर्षी सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व विधायक व लोकहितोपयोगी कार्यक्रम राबविण्याची परंपरा जोपासली आहे मोहनराव पाटील यांचे कार्य सामाजिक काम शासनाच्या सर्व कल्याणकारी योजना खेड्यात शहरात वस्त्या वाड्यावर पोहचवण्यासाठी त्यांनी मनापासून काम केले घरातील सर्व युवा नेतृत्व तसेच त्यांचे सर्व बंधू यांना त्यांनी राजकीय सामाजिक वारसा जोपासताना सर्वसामान्य माणूस केंद्रबिंदू मानून त्यांना मदत करा हा सल्ला दिला त्यामुळे या घराण्याकडे अनेकदा सत्ता आली काही वेळ सत्तेपासून अलिप्त रहावे लागले पण त्यांनी कधी कमी पणा मानला नाही किंवा सत्तेत आहोत म्हणून बडेजाव मिरवला नाही पण लोकभावना व समाज हित जोपासण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सोडले नाहीत अनेक विषय मुद्दे आठवणी घटना सांगण्यासारखा आहेत परंतु लिखाणाला शेवट करण्यासाठी मर्यादा पाळली पाहिजे जनतेच्या मनातील लोकनेते मोहनराव पाटील यांना त्यांच्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन