सेवानिवृत्त पोलिस अधिकारी मधुकर रामराव कदम यांचे निधन
सेवानिवृत्त पोलिस अधिकारी मधुकर रामराव कदम यांचे निधन
श्रीपूर
सेवानिवृत्त पोलिस अधिकारी मधुकर रामराव कदम वय 78यांचे आज सकाळी लातूर येथे अल्प आजाराने दुःखद निधन झाले आहे त्यांच्या पश्चात पत्नी तीन विवाहित मुली एक विवाहित मुलगा नातवंडे असा परिवार आहे मधुकर कदम यांनी अकलूज पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक म्हणून चार वर्षे सेवा बजावली आहे ते कोरेगाव पंढरपूर सोलापूर व करमाळा येथे उपअधीक्षक पदावर कार्यरत होते तेथेच ते सेवानिवृत्त झाले पंढरपूर येथे पोलिस निरीक्षक असताना डोंबे प्रकरण गाजले होते त्यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रातील पहिला टाडा डोंबे भोसले व इतर आरोपींना लागला होता अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने व पोलीस खात्यात त्यांनी उत्कृष्ट सेवा केली त्यांचा मुलगा डेंटिस्ट असून पुणे येथे मोठा दवाखाना ते चालवतात माळशिरस तालुका राष्ट्रीय साखर कामगार संघाचे शेती महामंडळ कामगार सेक्रेटरी भालचंद्र शिंदे यांचे ते सख्खे मामा होते अकलूज परिसरात कदम साहेब म्हणून जुने जाणते लोक आजही त्यांना ओळखतात माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे व कदम साहेब यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते मधुकर रामराव कदम यांचे निधनामुळे अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे त्यांचेवर लातूर जिल्ह्यातील त्यांच्या गावी संध्याकाळी अंतीम संस्कार करण्यात येणार आहेत