solapur

रिक्षा चालकाची पत्नी झाली अकलूज नगरपरिषदेची नगरसेविका

रिक्षा चालकाची पत्नी झाली अकलूज नगरपरिषदेची नगरसेविका

संचार वृत्त अपडेट 

अकलूज नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणूकीमध्ये भारतीय जनता पक्षाच्या वतीने दिपाली संतोष वाघमोडे यांनी प्रभाग ८ अ मधून पहिल्यांदाच निवडणुक लढवली होती.चुरशीच्या निवडणूकीत त्यांनी विजय मिळवला आहे.त्यांना भारतीय जनता पक्षाने समाजसेवा करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पण एक रिक्षाचालक होते.त्यांनी निवडणूक लढवून आमदार झाले मंत्री झाले.नंतर त्यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्रीपद भूषविले होते.पण अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीत रिक्षा चालक संतोष वाघमोडे यांच्या पत्नी दिपाली वाघमोडे यांनी भारतीय जनता पक्षाच्या वतीने पहिल्यांदाच निवडणूक लढवली व त्यात त्यांनी विजय संपादन केला आहे.त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
नूतन नगरसेविका दिपाली वाघमोडे या सर्व सामान्य घरातील महिला आहेत.यांचे पती संतोष वाघमोडे यांनी भारतीय जनता पक्षाचे २००८ पासून कार्यरत आहेत.व सदस्य ही आहेत आणि त्यांच्याकडे भारतीय जनता पार्टी अकलूज शहराचा सहसचिव पदाचा कार्यभार दिला.त्यांच्या या कार्याची पोच पावती म्हणून भाजपने त्यांच्या पत्नीला अकलूज नगरपरिषदेच्या निवडणुकीत तिकीट दिले होते.अअकलूजच्या मतदारांनी पक्षावर व उमेदवारावर विश्वास ठेवून निवडून दिले आहे.दिपाली वाघमोडे यांच्याकडे आता भारतीय जनता पक्षाने अकलूज शहर महिला मोर्चा चे अध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे, मा.आ.राम सातपुते, अकलूज शहर मंडल अध्यक्ष सुजय माने पाटील, अकलूज शहर अध्यक्ष महादेव कावळे, यांच्या विकासात्मक राजकारणाचे दर्शन घडले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छ अकलूज सुंदर अकलूज यासाठी मी माझ्या प्रभागात प्रयत्न करणार आहे.यामध्ये गटारी,लाईट व पाण्याची सोय यासाठी प्रयत्न करूण.त्यासाठी महाराष्ट्र शासनाकडून अकलूजमधील विकासाच्या कामासाठी भरपूर निधी उपलब्ध करणार आहे तसेच महिलांसाठी नवनवीन उद्योग, तरुण वर्गासाठी उद्योग सुरू व्हावेत यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. .महिलांचे सक्षमीकरण व सबलीकरण करण्यासाठी विशेष लक्ष देणार .भारतीय जनता पक्षाने माझ्या सारख्या एक सर्वसामान्य स्त्रीला नगरसेविका होण्याची संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पक्षाचे मी आभारी आहे.या मिळालेल्या संधीचे मी सोने करणार आहे.

दिपाली  वाघमोडे
नगरसेविका न.प.अकलूज

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button