solapur

बसव विचाराने घडलेले उत्कर्ष शेटे यांना ‘शिव बसव पुरस्कार” पद मोठे नाही फक्त समाजातील जबाबदारी ! तीस वर्षाचा कार्याचा सन्मान सोहळा

बसव विचाराने घडलेले उत्कर्ष शेटे यांना ‘शिव बसव पुरस्कार”

पद मोठे नाही फक्त समाजातील जबाबदारी ! तीस वर्षाचा कार्याचा सन्मान सोहळा !

संचार वृत्त अपडेट (लक्ष्मीकांत कुरुडकर)

समाजकारण, शिक्षण आणि सेवाभाव या त्रिसूत्रीवर चालणाऱ्या उत्कर्ष शेटे  यांच्या तीन दशकांच्या सामाजिक कार्याची दैनिक दिव्य मराठीने दखल घेतली.“शिव बसव पुरस्कार” देऊन त्यांच्या कार्याचा गौरव होणार आहे.हा सन्मान सोहळा लवकरच मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे.बसवेश्वरांच्या विचारांनी प्रभावित झालेले उत्कर्ष शेटे यांचा प्रवास हा प्रेरणादायी आहे.“पदापेक्षा जबाबदारी मोठी” हे ब्रीद घेऊन त्यांनी समाजकारणात प्रवेश केला.रक्तदानातून कृतज्ञता आणि स्वच्छतेतून अभिवादन हा त्यांच्या कार्याचा पाया आहे. “बसव अनुभव” पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आजबसव विचारांच्या सार्वजनिक अधिष्ठानांपर्यंत पोहोचला आहे.समाजकारणासोबतच शिक्षा क्षेत्रातही त्यांनी विश्वासाची नवी जबाबदारी स्वीकारली. तरुणांची जाण, जिद्द आणि लेखणीतून त्यांना मिळालेले पंख यामुळेच ते समाजातील अनेक उपक्रमांमध्ये अग्रेसर आहेतआई-वडिलांच्या संस्कारांवर घडलेले उत्कर्ष शेटे यांनी गेल्या 30 वर्षांत निस्वार्थपणे केलेल्या समाजसेवेची दखल घेत दैनिक दिव्य मराठीने त्यांना या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला.हा पुरस्कार म्हणजे त्यांच्या तीन दशकांच्या घाम आणि जिद्दीचा सन्मान आहे. समाजातील वंचित घटकांसाठी, विद्यार्थ्यांसाठी आणि आरोग्य क्षेत्रासाठी त्यांनी केलेल्या कार्यामुळे ते आज अनेकांसाठी आदर्श बनले आहेत.सन्मान सोहळ्याची तारीख आणि स्थळाची घोषणा लवकरच केली जाणार आहे.

त्यांनी चित्रकलेतील पहिली रेषा,एसटीडी झेरॉक्स बूथ, रंगभूमीवरील प्रयोग,संगीत अल्बमची निर्मिती,‘जाणीव’ ‘निर्णय’ आणि ‘शिवनाट्य’सारखे विशेषांक, शासनमान्य ‘साप्ताहिक जिद्द’,‘अकलाई माझी सत्वाची’सारखी दृकश्राव्य निर्मिती केली,

ग्रामपंचायत सदस्य म्हणून विकासकामे,स्मशानभूमी स्वच्छता,महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता,मोफत वधू-वर मेळावे, OBC प्रश्नासाठी संघर्ष,बसवेश्वर स्मारकाची चळवळ,महात्मा बसवेश्वर चौक, कार्यकर्तृत्व पुरस्कार,जिद्द पुरस्कार,वस्त्रदान,रक्तदान, अन्नदान,आरोग्य शिबिरे,वृक्षारोपण,पर्यावरण जनजागृती,आई-वडील कृतज्ञता सोहळे, शिवदीक्षा आणि ‘महात्मा बसवेश्वरांची शिदोरी’ या सर्व प्रवासामध्ये एक समान सूत्र दिसून येते.या प्रवासात मोहिते-पाटील परिवाराशी असलेले ऋणानुबंध आणि विशेषतः जयसिंह मोहिते-पाटील अर्थात बाळदादा यांनी वेळोवेळी दिलेला विश्वास, संधी आणि प्रोत्साहन हा महत्त्वाचा आधार राहिला.

चित्रकलेतील तरुणाच्या पाठीवर कौतुकाची थाप देण्यापासून ‘अकलाई माझी सत्वाची’ प्रकल्पाला आशीर्वाद देणे,महात्मा बसवेश्वर स्मारक समिती पुढे शिक्षण प्रसारक मंडळावर संचालक म्हणून जबाबदारी देण्यापर्यंत त्यांचे नाते विविध टप्प्यांवर दृढ होत गेले.अशा या कला,पत्रकारिता,सांस्कृतिक चळवळ,लोकप्रतिनिधित्व, वीरशैव-लिंगायत समाजकार्य,धार्मिक प्रबोधन आणि सेवाभावी उपक्रमांच्या दीर्घ वाटचालीची दखल घेत उत्कर्ष शेटे यांची ‘शिव-बसव प्रेरणा पुरस्कार २०२६’साठी निवड झाली आहे.हा गौरव एखाद्या एका कार्यक्रमाचा किंवा एका पदाचा परिणाम नसून १९९५ पासून विविध क्षेत्रांत सुरू असलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचा एकत्रित सन्मान म्हणून पाहिला जात आहे.कधी कुंचल्यातून व्यक्त होणारी संवेदना,कधी अंकाच्या पानातून उमटणारा विचार,कधी रंगमंचावरचा सांस्कृतिक प्रयोग, कधी स्वच्छतेसाठी हातात घेतलेला झाडू,कधी गरजूच्या अंगावर पोहोचलेले वस्त्र, कधी रक्तदानातून मिळालेला जीवनाचा आधार,कधी वृक्षारोपणातून रुजवलेले भविष्य आणि आता घराघरांत पोहोचणारी महात्मा बसवेश्वरांची मूर्ती…
या सगळ्या प्रवासाला जोडणारा धागा एकच आहे, सामाजिक बांधिलकीची..!’आणि महात्मा बसवेश्वरांच्या विचारांच्या संदर्भात त्याची पुढची दिशा सांगणारा संदेशही तितकाच अर्थपूर्ण आहे,“मूर्ती देव्हाऱ्यात… वचन मनात… कायक हातात… आणि दासोह आचरणात! कला ते पत्रकारिता, पत्रकारिता ते समाजकारण आणि समाजकारणातून बसवविचारांच्या प्रसारापर्यंतचा हा प्रवास आता ‘शिव-बसव प्रेरणा पुरस्कार’ाच्या निमित्ताने नव्या टप्प्यावर पोहोचला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button