solapur

अकलूज झाले मेडिकल हब !अत्याधुनिक प्लास्टिक सर्जरी, ओबीसीटी चा दिमागदार शुभारंभ आरोग्य सेवेचे नवे पर्व सुरू खासदारांच्या हस्ते नव्या व अँपेक्सचे उद्घाटन

अकलूज झाले मेडिकल हब !अत्याधुनिक  प्लास्टिक सर्जरी, ओबीसीटी चा दिमागदार शुभारंभ

 आरोग्य सेवेचे नवे पर्व सुरू
खासदारांच्या हस्ते नव्या व अँपेक्सचे उद्घाटन

संचार वृत्त अपडेट 

अकलूजच्या वैद्यकीय क्षेत्रात आणखी एक भर पडली आहे. जे नवीन क्षेत्र अकलूजमध्ये नव्हते, अशा अत्याधुनिक “नाव्या लेझर, कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजी आणि प्लास्टिक सर्जरी युनिट” व “अॅपेक्स ओबेसिटी क्लिनिक” चे उद्घाटनखासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
उद्घाटनानंतर बोलताना मोहिते-पाटील यांनी डॉक्टरांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले,“शंकरराव मोहिते-पाटील यांच्यामुळे सहकारात एक वेगळे जाळे आपल्या जिल्ह्यात निर्माण झाले. ते पुढे नेण्याचे काम आज सर्व डॉक्टर मंडळी करीत आहेत. <span;>सेवा टिकवून ठेवण्याचे काम आणि वेगळे नाव डॉक्टर मंडळींनी टिकवून ठेवले आहे. नवीन वैद्यकीय क्षेत्रात अपडेट होण्याचे काम आपण करत आहात. त्यामुळेच अकलूजचे नाव आज जगभर झाले आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.परदेशातील रुग्णांसाठी कमी पैशात दर्जेदार सेवा देण्यासाठी अकलूजमध्ये फाईव्ह स्टार हॉटेल व्यवसाय सुरू करणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. “आपण सर्व चांगले योगदान वैद्यकीय क्षेत्रात देत आहात, याचा मला अभिमान आहे”, असे सांगून त्यांनी डॉक्टरांचे अभिनंदन केले.
नाव्या सेंटर मध्ये लेझर, कॉस्मेटिक गायनॅकॉलॉजी आणि प्लास्टिक सर्जरी सारख्या अत्याधुनिक सुविधा उपलब्ध होणार आहेत.अॅपेक्स ओबेसिटी क्लिनिक मध्ये लठ्ठपणा आणि वजन कमी करण्यावर विशेष उपचार मिळणार आहेत.
या कार्यक्रमाचे आयोजन डॉ. रेवती राणे, डॉ.रोहित फडे, डॉ. विक्रमसिंह गायकवाड, डॉ. तेजस्विता राऊत यांच्यासह डॉ. नितीन राणे यांनी केले होतेडॉ. सतीश दोशी आणि डॉ. राजीव राणे हे मार्गदर्शक म्हणून लाभले.या दुहेरी उद्घाटनामुळे अकलूज हे आता केवळ कृषी आणि सहकारच नव्हे तर वैद्यकीय पर्यटनाचेही केंद्र बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.याप्रसंगी बोलताना डॉ. रेवती राणे म्हणाल्या की, “सौंदर्य व स्वतःची काळजी (सेल्फ-केअर) घेणे हे आता केवळ मोठ्या शहरांतील किंवा फक्त उच्चभ्रू लोकांसाठी सीमित नाही. ग्रामीण भागातील नागरिकांना आणि विशेषतः महिलांना प्रसूतीनंतर किंवा रजोनिवृत्तीच्या काळात येणाऱ्या अनेक शारीरिक समस्यांवर आता अत्यंत सुरक्षित आणि आधुनिक उपचार अकलूजमध्येच पुणे मुंबई च्या मानाने अत्यंत कमी खर्चात आपल्या अकलूज मध्ये उपलब्ध झाले आहेत.
महिलांच्या खाजगी समस्या, योनीमार्गाचा सैलपणा/कोरडेपणा आणि मेनोपॉजच्या समस्यांवर प्रगत लेझर उपचार.​HIFEM तंत्रज्ञान (इलेक्ट्रोमॅग्नेटिक चेअर): शस्त्रक्रियेशिवाय केवळ बसल्या जागी पेल्विक स्नायूंना बळकटी देणारे आणि हसताना/खोकताना होणाऱ्या ‘मूत्र गळती’वर (SUI) प्रभावी उपाय करणारे आधुनिक मशीन उपलब्ध आहे
लेझर हेअर रिमूव्हल, अँटी-एजिंग (बोटॉक्स/फिलर्स), हायड्राफेशियल आणि केस गळतीवर PRP ट्रीटमेंट.प्लास्टिक आणि रिकन्स्ट्रक्टिव्ह सर्जरी: हेअर ट्रान्सप्लांट, लिपोसक्शन (अतिरिक्त चरबी काढणे), टमी टक, आणि स्तनांच्या व चेहऱ्याच्या (नाकाचा आकार सुधारणे इ.) सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया.येथे असून मूळव्याध, भगंदर (फिस्टुला), पिलोनिडल सायनस आणि व्हेरिकोज व्हेन्स (फुगलेल्या शिरा) यांवर विनाटाका लेझर उपचार.वाढत्या वजनावर आणि त्यामुळे होणाऱ्या आजारांवर मात करण्यासाठी ‘ॲपेक्स ओबेसिटी क्लिनिक’मध्ये विशेष उपचार होणार असल्याचे त्यांनी सांगितले.


​या प्रकल्पासाठी ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. सतीश दोशी , डॉ. विनोद शेटे (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ. रेवती राणे (स्त्रीरोगतज्ज्ञ), डॉ. विक्रमसिंह गायकवाड (स्त्रीरोगतज्ज्ञ),डॉ. रोहित फडे (सर्जन), डॉ. तेजस्विता राऊत (त्वचारोग तज्ज्ञ) आणि डॉ. नितीन राणे ( संचालक, ॲपेक्स ओबेसिटी) यांच्यासह तज्ज्ञ डॉक्टरांची संपूर्ण टीम आता रुग्णांच्या सेवेसाठी सज्ज झाली आहे. शिवाय येथे सर्व प्लास्टिक सर्जरी आणि त्यासंबंधित उपचारांसाठी मिरज येथील सुप्रसिद्ध प्लास्टिक सर्जन डॉ. अक्षय कुलकर्णी हे कन्सल्टंट म्हणून उपलब्ध असतील.


कार्यक्रमास , हृदयरोग तज्ञ डॉ. एम. के. इनामदार ,ज्येष्ठ बालरोगतज्ज्ञ डॉ. राजीव राणे , डॉ विद्युत शहा , आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ संजय सिद, होमिओपॅथी संघटनांचे अध्यक्ष डॉ अभिजीत राजेभोसले , वैद्यकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर डॉक्टर, पत्रकार व परिसरातील नागरिक आदी उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button