solapur

ग्रामदैवत अकलाई देवीच्या शारदीय नवरात्रौत्सवास घटस्थापनेने सुरुवात

ग्रामदैवत अकलाई देवीच्या शारदीय नवरात्रौत्सवास घटस्थापनेने सुरुवात

संचार वृत्त अपडेट

अकलूज येथील अकलाई देवीच्या शारदीय नवरात्रोत्सवास घटस्थापनेने सुरुवात झाल्यानंतर ग्रामस्थ घरगुती घटस्थापना करतात. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सुलभ दर्शनासाठी भक्तगण पुढाकार घेतात. अकलाई देवीच्या नावावरूनच या गावाला अकलूज नाव पडल्याचे मानले जाते. येथील नीरा नदीकाठी शहरालगत या देवीचे प्राचीन मंदिर होते.

मात्र पुढे या मंदिराच्या विश्वस्त मंडळाचे मागणीवरून राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या प्रयत्नातून या मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे. विश्वस्त जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या मंदिरात संपूर्ण वर्षभर धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असते. नवरात्रात दररोज पहाटे २.१५ वाजता महापूजा व सायंकाळी ५ वा. आरती या नित्य उपक्रमांबरोबरच दररोज संध्याकाळी ७ वाजता देवीचा छबिना निघतो.या ९ दिवसात दररोज दुपारी १२ ते ३ या वेळेत भजन तर सायंकाळी ४ ते ७ या वेळेत शहरातील १००० महिला देवी महात्म्य वाचनातून नामजप करणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button