solapur

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध उपक्रमांनी साजरी

संचार वृत्त अपडेट 

महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटना लहुजी शक्ती सेना माळशिरस तालुका व लहुजी साम्राज्य अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने अकलूज येथील जुन्या बस स्टॅन्ड नजीक साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या 105 वी जयंती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी करण्यात आली
डॉ.धवलसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा जयंती सोहळा साजरा करण्यात आला. प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉ. एम.के. इनामदार शिवप्रसाद उद्योग समूहाचे अध्यक्ष शरद मोरे नवनाथ साठे यांच्या हस्ते माळशिरस तालुक्यातील विविध गावच्या समाज बांधवांना अण्णाभाऊ साठे यांचे 21 पूर्णाकृती पुतळे 100 मुलींच्या नावावर प्रत्येकी 5000 रुपयांचे फिक्स डिपॉझिट शालेय मुला मुलींना 5000 वह्यांचे वितरण अकलूज नगर परिषदेतील महिला सफाई कामगारांना साड्यांचे वाटप करण्यात आले.


यावेळी अण्णासाहेब इनामदार,अण्णासाहेब शिंदे, सतीश पालकर, सुधीर रास्ते,मयूर माने, बबनराव शेंडगे, रणजीत देशमुख, ज्योती कुंभार, व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवशाहीर राजेंद्र कांबळे यांचा शाहिरीचा कार्यक्रम पार पडला सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असल्यामुळे नवनाथ साठे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. संध्याकाळी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची जंगी मिरवणूक काढण्यात आली.अत्यंत लहान वयात उत्कृष्ठ असे अनेक सुबक शिल्प साकारणारे युवा पिढीचे आदर्श  सुरज युवराज जगताप यांना युवा शिल्परत्न पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले
समाजातील दुर्बल घटकांना मदत करणे हीच खरी समाजसेवा आहे या तिन्ही संघटनांच्या समाजसेवेच्या कामात मी आणि शरद मोरे नेहमीच मदत करू असे आश्वासन डॉ. एम. के इनामदार यांनी दिले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button