स्मार्ट मीटरच्या नावाखाली अकलूजकर वेठीस

स्मार्ट मीटरच्या नावाखाली अकलूजकर वेठीस
संचार वृत्त अपडेट
अकलूज हद्दीत सध्या विविध ठिकाणी स्मार्ट मीटर किंवा अद्ययावत वीज मीटर बसवण्याच्या नावाखाली सर्वसामान्य नागरिकांना वेटीस धरले जात असल्याच्या तक्रारी समोर येत आहेत. काही नागरिकांनी आरोप केला आहे की हे मीटर शक्तीने बसवले जात असून त्याविषयी कोणतीही स्पष्ट माहिती नागरिकांना दिली जात नाही. अकलूज परिसरातील अनेक भागांमध्ये नागरिकांच्या घरी विजेचे नवीन नवीन मीटर बदलण्यासाठी संबंधित अधिकारी व ठेकेदार येत आहेत. मात्र या मीटरच्या अचूकतेबाबत खर्चाबाबत किंवा यामुळे होणाऱ्या बदलाविषयी नागरिकांना स्पष्ट माहिती दिली जात नाही काही ठिकाणी जुने मीटर योग्य स्थितीत असतानाही ते हटवून नवीन मीटर बसवले जात आहेत ज्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि असंतोष निर्माण झाला आहे
नागरिकांच्या म्हणण्यानुसार जुन्या मीटरच्या येणाऱ्या बिलापेक्षा स्मार्ट मीटर चे बिल अधिक येत आहे मुख्यमंत्री फडणीस यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की सर्वसामान्यांना वेटीस धरून मीटर बसवले जाणार नाहीत. प्रथम सर्व शासकीय कार्यालयामध्ये हे मीटर बसवले जातील तदनंतर सर्वसामान्य वीज ग्राहकांना मीटर देण्यात येतील पण कुठल्याही सरकारी कार्यालयात मात्र असे मीटर बसवलेले दिसत नाहीत.
या प्रकरणात महावितरण यांच्या भूमिकेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. जर हा प्रकल्प खरंच जनहितासाठी असेल तर त्याचे माहिती नागरिकापर्यंत व्यवस्थित पोहोचवणे जनजागृती करणे आणि त्यांच्या सहमतीनेच मीटर बसवणे गरजेचे आहे.
अन्यथा असा बदल एक प्रकारे जबरदस्ती ठरेल अकलूज हद्दीतील नागरिकांनी आता यासंदर्भात आवाज उठवण्यास सुरुवात केली आहे. प्रशासनाने तात्काळ खुलासा करावा प्रक्रिया पारदर्शक करावी आणि नागरिकांच्या प्रश्नांची उत्तरं द्यावीत याबाबत अकलूज वीज वितरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता याबाबत पुरेशी माहिती आमच्याकडे उपलब्ध नसून इतर माहिती देण्यासही असमर्थता असल्याचे दिसत आहे.
दरम्यान माळशिरस तालुक्या सह सोलापूर जिल्ह्यात स्मार्ट मीटर ला विरोध केला जात आहे. त्यामुळे भविष्यात आंदोलनाची तीव्रता वाढण्याचे शक्यता आहे स्मार्ट मीटर हे ग्राहकांच्या मुळावर आल्याची संतप्त प्रतिक्रिया माळशिरस तालुक्यातील ग्राहकांमधून उमटत आहे.