“शासन व्यवस्थेला हवा असलेला न्याय,, म्हणजेच न्याय,,,,,! आ.उत्तमराव जानकर जात दाखला प्रकरण
शासन व्यवस्थेला हवा असलेला न्याय ,, म्हणजेच न्याय,,,,,! आ. उत्तमराव जानकर जात दाखला प्रकरण
संचार वृत्त अपडेट
ऍड अविनाश टी काले अकलूज
मो न 9960178213
दोन ते तीन दिवसांपूर्वी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात भाजप चे आ अमित गोरखे यांनी एक लक्षवेधी मांडली .
ही लक्षवेधी वरवर साधी वाटत असली तरी त्यास भाजपच्या रणनीतीची झालर आहे , अचूक असे प्लॅनिंग आहे ,
ही लक्षवेधी येण्यापूर्वी भाजपचे आ गोपीचंद पडळकर यांनी सभागृहाच्या बाहेर केलेले वक्तव्य ,, जे लोक मूळ हिंदू धर्म सोडून अन्य धर्मात विशेषतः ख्रिच्छन व इस्लाम धर्मात जातील त्यांचे मूळ जात प्रमाणपत्राच्या आधारे मिळवलेले सर्व शासकीय लाभ जे (एस सी , एस टी , व्हीजे एन टी,ओबीसी) नष्ट केले जावेत ,, कारण इतर धर्मात अशी जात व्यवस्था अस्तित्वात नाही ,, हा मुद्दा त्यात होता ,
त्यास च जोडून , (आरक्षित कोट्यातून अन्य जात समूहाच्या व्यक्तीने अन्य जातीचे आहोत असे दर्शवून लढवलेल्या निवडणुका द्वारे मिळवलेल्या विजया द्वारे प्राप्त केलेले शासकीय पद , त्या द्वारे मिळवलेले लाभ याची वसुली केली जाणार का?
याला उत्तर देताना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे उत्तर दिले त्या नुसार बौद्ध , शीख या धर्मीय शिवाय अन्य धर्मात गेलेल्या व्यक्तीचे आरक्षण संपुष्टात येण्याची तरतूद सुप्रीम कोर्टाच्या निकाला मुळे झाली आहे ,, असे उत्तर दिले ,
लोक प्रतिनिधी होण्या साठी राखीव कोट्यातील निवडणुका ज्यांनी लढवल्या त्यांचे जात प्रमाण पत्र जात पडताळणी समितीने अवैध ठरवले नंतर असे आरक्षण ही आपोआप संपुष्टात येईल व त्यांनी घेतलेले लाभ याची वसुली करता येईल असे ही कठोर कायदे करू असे उत्तर त्यांनी लक्षवेधी ला दिले ,,,
या बातम्या युट्यूब चॅनल द्वारे प्रसारित झाल्या आणि त्यावर एक प्रश्न हमखास विचारला होता
“माळशिरस तालुक्यात विधानसभेची पोट निवडणूक लागेल का,,,?”
या प्रश्नात एक पोट प्रस्न दडलेला होता ,, आ उत्तमराव जानकर यांची आमदारकी रद्द होणार का ?
याचे उत्तर देताना समर्थक कोणत्या बाजूचे आहेत त्या आधारे आपल्या आपल्या बाजूचे समर्थन करणारी उत्तरे दिली गेली ,,,
कांहीं महिन्या पूर्वी माळशिरस नगरपालिका चे नगराध्यक्ष आप्पासाहेब देशमुख यांनी आ उत्तमराव जानकर यांनी त्यांच्या मूळ गावी धोनोऱ्याच्या ओढ्यात खेकडे मासे पकडावे इतका निवांत वेळ त्यांना मिळणार आहे असे वक्तव्य केले होते ,,
माळशिरस तालुक्याचे स्मृति शेष आ हनुमंत राव डोळस यांनी 2009साली आ उत्तमराव जानकर यांच्या जात दाखल्याला हरकत घेणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली होती ,,
जात पडताळणी समिती , ते मुंबई हायकोर्ट असा प्रदीर्घ प्रवास करून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले होते व त्यांनी त्यास “जैसे थे” असे ठेऊन त्यांचा रद्द केलेला जात दाखला त्यांना महाराष्ट्र शासनाने दिला होता ,
अर्थात 2019ला भाजपला दिलेल्या पाठिंब्याची ती परतफेड होती व हे गिफ्ट तत्कालीन भाजपचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते त्यांना देण्यात आली होती .
ती राजकीय परिस्थिती 2024मध्ये बदलली , आ उत्तमराव जानकर यांनी भाजपची साथ सोडली , तशीच ती मोहिते पाटील यांनी ही सोडली ,
खासदारकीच्या स्पर्धेत थेट मोहिते पाटील उतरले आणि भाजप ने तिकीट नाकारल्या नंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (श प)कडून ते प्राप्त केले •
आपले पारंपारिक राजकीय वैरत्व बाजूला ठेऊन मोहिते पाटील व जानकर हे एकत्रित आले , ते येण्यासाठी त्यांची 2019सालच्या लोकसभा निवडणुकीत भाजपला दिलेल्या पाठिंब्यामुळे स्टेज वर एकत्रित आले , अकलूज मार्केट कमिटीत आ उत्तमराव जानकर यांचा सदस्य म्हणून झालेला शिरकाव ही या जवळीक ते साठी उपयुक्त ठरला असणार ,,
विशेषतः ज्या मा आ रामभाऊ सातपुते यांना पक्षाने सांगितले म्हणून स्वतःची शक्ती लाऊन मोहिते पाटील यांनी निवडून दिले होते त्यांनी मोहिते पाटील यांच्या बंडाळी नंतर ही स्व पक्षाशी निष्ठा ठेवल्या ने मोहिते पाटील यांच्या लोकसभेतील उमेदवारीला विरोध केल्याचे श्यल्य मोहिते पाटील यांना वाटले , व कसल्याही परिस्थितीत रामभाऊ सातपुते यांना माळशिरस तालुक्यातून विजयी होऊ द्यायचे नाही या भूमिकेतून जो कडवा संघर्ष उभा राहिला त्यातून ही मोहिते पाटील व जानकर यांचा गट एकत्रित आला ,
खासदारकी ला जानकर गटाने प्रामाणिक प्रयत्न केले , आणि त्याची परतफेड विधानसभेला मोहिते पाटील यांनी ही केली
दोंघांची स्वप्ने पूर्ण झाली , परंतु भाजपा सारखा शक्तिशाली पक्ष दुखावला गेला ,
आ उत्तमराव जानकर यांनी त्यांचे उपद्रव मूल्य वाढते ठेवले , ईव्हीएम विरोधातील त्यांची लढाई देशभर गाजली , अगदी जंतर मंतर वर दिल्ली ला धरणे आंदोलन करण्याच्या रणनीती ला परवानगी नाकारून ते आंदोलन भाजप ने शांत केले , जरांगे पाटील विरुद्ध ओबीसी संघर्ष सारखी प्रकरणे स्थिरावल्या नंतर त्यांनी आ उत्तमराव जानकर यांच्या विरोधातील लढाईला हात घातला ,,
सुप्रीम कोर्टात मुंबई हायकोर्टाच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या रिट पीटिशन मध्ये , पीटिशन हे वारसा हक्क सारखे नसते असा निर्णय आल्याने ते बाजूला पडलेले असताना त्यात मूळ याचिका कर्त्याच्या पीटिशन मध्ये महाराष्ट्र शासन सहभागी झाले , आणि या रीटपीटिशन मध्ये सामील झालेल्या महाराष्ट्र शासनाने स्वतःचा वकील व त्यांचा खर्च समाज कल्याण विभागाच्या वतीने देण्याचे पत्रक काढले , ते पत्रक माझ्या कडे होते ,
परंतु गोपनीयता आणि तत्कालीन परिस्थितीत माझ्यावर दाखवलेला विश्वास म्हणून ते मी प्रसिद्ध केले नव्हते व ती गोपनीयता मी पाळली ,,
आत्ता हे प्रकरण पुन्हा मुंबई हायकोर्टात पुनर्विचार साठी आले आहे ,
इथे फक्त कागदपत्रांच्या आधारे निकालाचे परीक्षण होते , तिथे पुन्हा नव्याने युक्तीवाद होत नाहीत म्हणुन अधिक कालव्यप्यय होण्याच्या शक्यता ही नसते ,,
याचिकेतील संकल्प डोळस यांचा फक्त चेहरा आहे , समग्र सूत्रे ही महाराष्ट्र शासनाच्या विद्यमान महायुती चे सर्व्हे सर्वा ना देवेंद्र जी फडणवीस यांच्या हातात आहेत परिस्थितीत पुन्हा एकदा जोरकस पालट झालेला आहे ,
काल पर्यंत उदासीन असलेले विधान परिषद आ रणजितसिंह मोहिते पाटील भाजपा कडून सक्रिय झाले आहेत , त्यांनी घेतलेल्या उपक्रमानुसार रक्तदान शिबिर , वृक्षारोपण इत्यादीस शिवबाबा व अर्जुनसिंह मोहिते पाटील यांची ही उपस्थिती आहे , या घडामोडी हेच दर्शवतात की मोहिते पाटील यांना भाजपा सोडायची नाही ,,
या ठिकाणी मला इतकेच सांगायचे आहे की राज्यकर्त्यांना सोयीचे असलेले निकाल ही न्याय व्यवस्था आणि प्रशासकीय व्यवस्था या कडून दिले जातात .
यात न्यायाचा भाग कमी असतो तर राज्यकर्त्यांच्या सोयीचा अधिक असतो ,, म्हणून
समर्थकांना काय वाटते या ही पेक्षा व्यवस्थेला काय वाटते ? हे महत्वाचे ठरते ,
महा पर्व ला दिलेल्या मुलाखतीत आ उत्तमराव जानकर साहेबांनी पूर्व अनुभवा आधारे केलेली वक्तव्य कांहीं ही असतील तरी ही लढाई त्यांचे साठी कठीण अशीच आहे ,,
निकाल काय असेल ? हे मी सांगण्याची आवश्यकता नाही ,
तो निकाल आणि त्यांचे भवितव्य भाजप ने ठरवलेले आहे ,, इतकेच ,,,!