महर्षि संकुलात श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील जयंतीनिमित्त बक्षीस वितरण संपन्न

महर्षि संकुलात श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील जयंतीनिमित्त बक्षीस वितरण संपन्न
संचार वृत्त अपडेट
महर्षि संकुल यशवंतनगर येथे श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जयंतीचे औचित्य साधून बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून वसंत पांडुरंग जाधव संचालक शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज उपस्थित होते. कार्यक्रमासाठी प्रशाला समिती सदस्य कैलास चौधरी, अनिल जाधव ,विनोद जाधव, नितीन इंगवले देशमुख , मुख्याध्यापक संजय गळीतकर उपस्थित होते.
प्रमुख अतिथींचे स्वागत महर्षि बाल वाद्य वृंदा कडून स्वागत गीताने करण्यात आले. लक्ष्मीबाई कन्या प्रशालेच्या मुख्याध्यापिका अनिता पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.प्रमुख मान्यवरांच्या हस्ते श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले. सर्व मान्यवरांचा सन्मान समारंभ संकुलाच्या वतीने पार पडला.
काव्या सावंत व श्रावणी मोहिते या विद्यार्थिनींनी आपल्या तडफदार भाषाशैलीत भाषण केले. संकुलातील सहशिक्षिका सुषमा काशीद यांनी आपल्या मनोगतातून सीमेवर राहून काम करणे हे गोल्डन वर्क व घरी राहून समाजासाठी काम करणे म्हणजे सिल्वर वर्क असे मत मांडत श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जीवन कार्यावर आदरांजली वाहिली.
प्रशालेतील कला, क्रीडा व विविध स्पर्धेत यश मिळवणाऱ्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जयंतीनिमित्त शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज आयोजित एसपीएम चित्रकला स्पर्धेचे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात चित्रकला कागद वाटप करून करण्यात आले.
प्रमुख अतिथी वसंत पांडुरंग जाधव संचालक शिक्षण प्रसारक मंडळ अकलूज यांनी आपल्या मनोगतातून नेतृत्व ,कर्तृत्व व मातृत्वाची शिदोरी सांभाळणाऱ्या श्रीमती रत्नप्रभादेवी मोहिते पाटील यांच्या जीवन कार्याची माहिती दिली.
सदर कार्यक्रमासाठी उपमुख्याध्यापक आसिफ झारेकरी,पर्यवेक्षक अंकुश एकतपुरे ,राजाराम काळे ,भाग्यश्री उरवणे सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रचना रणनवरे यांनी केले व आभार मुख्याध्यापक शिवाजी पारसे यांनी मानले.
कार्यक्रमाचीज्ञसांगता सारे जहाँ से अच्छा समूहगीताने करण्यात आली.