अकलूज येथील धवल श्रीराम मंदिरात ” नागपंचमी उत्सव २०२५ ” निमीत्त विविध स्पर्धाचे आयोजन

अकलूज येथील धवल श्रीराम मंदिरात ” नागपंचमी उत्सव २०२५ ” निमीत्त विविध स्पर्धाचे आयोजन
सिनेट सदस्या पद्मजादेवी प्रतापसिह मोहिते पाटील याच्या मार्गदर्शनाखाली भव्य आयोजन.
संचार वृत्त अपडेट
“पंचमीचा छंद बाई मला ग लागला…चला जावू वारुळाला… चला जावू नागोबाला पुजायाला…दुध लाह्या वाहू नागोबाला.” नागपंचमीचा सण म्हणजे महिलांनी पारंपारिक खेळाचा मनमुराद आनंद घेणारा सण आहे.नवविवाहीत मुली श्रावण महिन्यात पहिल्यांदा माहेरी आल्यानंतर श्रावण महिन्यातील पहिला सण म्हणजे नागपंचमी.या सणाच्या दिवशी मुली व महिला पारंपारिक खेळात रंगून जातात.
पद्मजादेवी प्रतापसिंह मोहिते-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व सौ.उर्वशीराजे धवलसिंह मोहिते-पाटील यांच्या नियोजनाखाली महाराष्ट्र राज्य जनसेवा संघटनेच्या वतीने ” नागपंचमी उत्सव २०२५ ” या कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले आहे.अकलूज परिसरातील महिला व मुलींना आपल्या सुप्त कलागुणांना वाव मिळवण्यासाठी व त्यांचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी विविध खेळांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.तरी या स्पर्धेत महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आकर्षक बक्षिस जिकंण्याचा आनंद घेऊ या. ” चला तर मग मुक्त होऊनी खेळू खेळू या व आकर्षक बक्षिसे जिंकू या…!”
पाककला स्पर्धेमध्ये उपवासाचे पदार्थ,मेकअप स्पर्धा एच.डी.दुल्हन मेकअप आणि हेअरस्टाईल,नवदुर्गा मेकअप,निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा,रांगोळी स्पर्धा संस्कार भारती निसर्ग सौंदर्य माझे आवडते दैवत,ठिपक्यांची रांगोळी,मेहंदी स्पर्धा दुल्हन मेहंदी,पाककला स्पर्धा,निबंध स्पर्धा निसर्गाची किमया अतिथी देवो भव, माझे स्वप्न,आजोळच्या आठवणी, संस्काराची शिदोरी,वत्कृत्व स्पर्धा आधुनिकतेचा मानवी जीवनावर होणारा परिणाम,माझे माहेर,एक उनाड दिवस,लेक वाचवा लेक शिकवा,सणांची संस्कृती या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत प्रथम क्रमाक विजेत्या महिलेला मानाची पैठणी साडी,द्वितीय क्रमांक विजेत्या महिलेला सोन्याची नथ,तृतीय क्रमांक विजेत्या महिलेला आकर्षक भेटवस्तू मिळणार आहेत.
मंगळवार दि. २९ जुलै २०२५ दुपारी ३ ते ४ पर्यंत मैदानी खेळ,उखाणे स्पर्धा,फेर गाणी, अभिनय डान्स,फोटोला टिकली लावणे,प्रश्न मंजुषा,दुपारी ४ ते ५ पर्यंत विविध स्पर्धा,सायंकाळी ५ ते ८ पर्यंत पैठणीचा खेळ स्थळ पी.एस.एम.पी.एस. इंग्लिश स्कूल, श्रीराम मंदिराजवळ अकलूज व धवल श्रीराम मंदिर इंदापूर रोड, धनश्रीनगर-अकलूज होणार आहे तरी बहुसंख्य महिलांनी या खेळात सहभागी होऊन बक्षीस जिंकावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.संपर्कासाठी मोबाईल.नंबर 8600848533/ 9890538366/7058049008 /7028560132/ 9028471450/9623533885