solapur

शंकरनगर येथे नागपंचमी सण सोहळ्याची जय्यत तयारी

शंकरनगर येथे नागपंचमी सण सोहळ्याची जय्यत तयारी .

संचार वृत्त अपडेट 

महाशिवरात्री यात्रा महोत्सव समिती चॅरिटेबल ट्रस्ट शंकरनगर यांच्यावतीने ट्रस्टचे अध्यक्ष व ग्रामीण संस्कृतीचे जोपासक जयसिंह मोहिते पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवार दि. २८ व मंगळवार दि. २९ जूलै २०२५ रोजी शंकरनगर येथील शिवपार्वती मंदिर परिसरात सायंकाळी ४ ते ८ या वेळेत आयोजित केलेल्या महीलांसाठी पारंपारीक खेळ,व नागपंचमी सण सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे.


सोहळ्याच्या आयोजिका. स्वरूपाराणी मोहिते पाटील,. ऋतुजादेवी मोहिते पाटील,  कृष्णप्रिया मोहिते पाटील यांच्या उपस्थितीत सदरचा सोहळा होत असून महिलांना पारंपारिक खेळाचा मनमुराद आनंद मिळावा, आपली संस्कृती जोपासावी या साठी सदरच्या सोहळ्याचे आयोजन केले आहे. यामध्ये नागपंचमीचा झोका, फेर, फुगडी,झिम्मा, पिंगा, काठवठकणा या सह विवीध पारंपारिक खेळांचा समावेश आहे. यावर्षी मात्र मोठ्या प्रमाणावर हा सोहळा साजरा होत आहे.
या साठी मंदिर परिसरात २५ हजार स्क्वेअर फुटाचा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला असून यामध्ये सुमारे १५ हजार महिलांना पारंपारिक खेळ खेळता येणार आहेत.
मंदिर परिसरात महिलांसाठी सेल्फी पॉईंट, अल्प दरात खाद्यपदार्थाचे स्टॉल्स उभारण्यात आले असून ग्रामीण बाज जपला गेला आहे.
दरवर्षी नागपंचमी सणानिमित्त हा सोहळा साजरा होणार आहे. या करीतां शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष संग्रामसिंह मोहिते पाटील, युवा नेते सयाजीराजे मोहिते पाटील यांचेही सहकार्य लाभले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button