solapur

केळी लागवड बरोबर वारा प्रतिबंधक पिकाची लागवड करा ! सेवारत्न सतीश शांताबाई कुंडलिक कचरे प्रभारी तालुका कृषी अधिकारी माळशिरस

केळी लागवड बरोबर वारा प्रतिबंधक पिकाची लागवड करा ! सेवारत्न सतीश शांताबाई कुंडलिक कचरे प्रभारी तालुका कृषी अधिकारी माळशिरस

संचारवृत्त अपडेट 

माळशिरस तालुक्यामध्ये शाश्वत पाणी व्यवस्थापन व पाण्याची सोय, पॅकिंग हाऊस, शीतगृह ,कमी कालावधीमध्ये येणारे हमी उत्पादन ,वाहतूक व्यवस्था, निर्यातश्रम उत्पादन, निष्ठांची सहज उपलब्धता, व्यापाऱ्यांचे जाळे व केळी रोपाचे विक्री सेंटर यामुळे केळी क्षेत्रात लक्षणे वाढ झालेली दिसून येत आहेत . प्रामुख्याने ऊस व इतर पिके खालील क्षेत्र केळी पिकाखाली वर्ग झाल्याची दिसून येत आहे . या क्षेत्राच्या वाढी बरोबर या पिकाशी संबंधित कीड व रोग प्रादुर्भाव वाढण्याची भविष्यात खूप शक्यता आहे . याच बरोबर वारंवार एकच घेतल्यामुळे या पिकावरील पडणारे किडी व रोग वाढणार आहे यावर उपाययोजना म्हणून व प्रतिबंधात्मक उपाय संबंधी ची माहिती शृंखलामध्ये आपण चर्चा करणार आहोत . या लेखामध्ये केळी पिक लागवडी बरोबर वारा प्रतिबंधक पिकाची लागवड वर माहिती घेऊया !केळी c4 वर्गातील वनस्पती असल्यामुळे खत व्यवस्थापन व एकात्मिक व्यवस्थापनाला चांगला प्रतिसाद देते यामुळे हमी उत्पादन मिळते तसेच केळीची पानांची संख्या पानांचे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ विचार केला तर ते इतर पिकाच्या तुलनेत खूप जास्त असते .भविष्यात एक पीक पद्धतीमुळे कीड व रोग चा प्रादुर्भाव वाढ होण्याची शक्यता नकारता येत नाही . त्यामुळे पिकाच्या उत्पादनात व प्रतवारीत लक्षणे घट येऊ शकते . तालुक्यातील केळी बागेचा विचार केला तर जास्तीत जास्त दहा टक्के केळी बागेला वारा प्रतिबंधकाचा वापर केलेला दिसून येत आहे . सर्व दूर केळी बागेची पाहणी केली असता 80 टक्के बागेची जून व नवीन पाने फाटलेले दिसून येतात फाटलेल्या पानामुळे वातावरणाशी उघड होणारे पृष्ठभागाचे क्षेत्रफळ वाढते यामुळे यातून पिकाने शोषून घेतलेली अन्नद्रव्य व पाण्याचे उत्सर्जन होऊन उत्पादनावर परिणाम होतो तसेच या वाढलेल्या पृष्ठभागाच्या क्षेत्रफळामधून बुरशीजन्य रोगाचा म्हणजेच केळी करपा या रोगाचा प्रादुर्भाव वाढण्याची दाट शक्यता असते .पाणी व अन्नद्रव्य उत्सर्जन, करपा रोगाचा प्रादुर्भाव यामुळे केळीच्या उत्पादनात आणि प्रतवारी लक्षणे गट झाल्याची दिसून येते . भविष्यात या अडचणीवर मात करण्यासाठी कमी खर्चाचा सहज करता येणारा प्रतिबंधात्मक उपाय आपल्याला करावा लागणार आहे तो म्हणजे केळी पिकाच्या बागेच्या पश्चिम दिशेला वारा प्रतिबंधक जिवंत झाडांचे कुंपण उदा – शेवरी, तुती, गिनीग्रास इत्यादीचा वापर करून वाऱ्यापासून केळीचे संरक्षण केले जाते. बागायत क्षेत्रामध्ये बांधाची रुंदी खूप कमी असल्यामुळे शेतकरी बांधवांना 80 टक्के शेडनेट किंवा जुन्या साड्यांचा पडदा तयार करून वारा प्रतिबंधक म्हणून वापर करता येतो. या उपायोजनामुळे वाऱ्यामुळे केळीचा बुंधा पीचकणे ,केळी उन्मळून पडणे, पाने फाटणे इत्यादीवर प्रतिबंधात्मक उपाय होऊन भविष्यातील उत्पादनातील आणि प्रतवारीतील हानी ढाळता येते .बऱ्यापैकी जॉब कार्ड धारक शेतकरी बांधव केळी पिकाची लागवड महात्मा गांधी रोजगार हमी योजना अंतर्गत फळपीक लागवड या योजनेतून घेत आहेत या योजनेमध्ये जिवंत झाडाच्या कुंपणाची तरतूद आहे . तरी याचाही लाभ शेतकरी बांधवांना घेता येईल वरील सर्व बाबीचा विचार करता केळी पडणे बुंधे पीचकणे पाने फाटणे, उन्मळून पडणे करपा रोगाचा प्रादुर्भाव तीव्रता कमी करणे इत्यादीपासून संरक्षण करायचे असेल तर कमी खर्चाचा प्रतिबंधात्मक वारा प्रतिबंधात लाईव्ह / जिवंत झाडांचे कुंपण किंवा शेडनेट जुन्या साड्या इत्यादींचा वापर करून वारा प्रतिबंधक म्हणून पश्चिम दिशेला याचा वापर केला तर वरील सर्व संभाव्य धोक्यापासून आपल्या बागेचे संरक्षण करू शकतो यात काय शंका नाही . तरी प्राधान्य क्रमाने शेतकरी बांधवांनी लागवडीवेळी वारा प्रतिबंधाची लागवड करणेबाबत या कार्यालयाचे अहवान आहे !केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे !

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button