अन्यथा अनेक शेतकरी आत्महत्या करतील कारखानदारांच्या थकीत एफ आर पीस जबाबदार कोण ; भानुदास सालगुडे पाटील

अन्यथा अनेक शेतकरी आत्महत्या करतील कारखानदारांच्या थकीत एफ आर पीस जबाबदार कोण ; भानुदास सालगुडे पाटील
संचार वृत्त अपडेट
सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी सुनील कुंभार यांनी नुकतीच ऊस जाऊन नऊ महिने झाले तरी उसाचे पैसे मिळाले नाहीत म्हणून आत्महत्या केली.साखर आयुक्त पुणे व साखर सहसंचालक यांनी काहीच कारवाई केली नसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या घडत आहेत असा आरोप भानुदास सालगुडे पाटील यांनी केला.
शेतकऱ्यांना पुढील वर्षी 2025-26 च्या हंगामात सोलापूर जिल्ह्यात २५० ते ३०० कोटी रुपये हे साखर सम्राटाकडून शेतकऱ्यांना देणे राहील. व शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती निर्माण होऊन आत्महत्या होतील. जिल्ह्यात 40 कारखाने आहेत पैकी 32 कारखाने चालू होऊ शकतात त्यापैकी 16 ते 17 कारखाने उसाचे बिल देऊ शकतील 15 कारखान्यांची परिस्थिती बिकट असून 100% रक्कम देऊ शकणार नाहीत याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे साखर आयुक्त व साखर सहसंचालक यांनी कडक भूमिका घेऊन शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घ्यावा असे आव्हान सालगुडे पाटील यांनी केले आहे.
कारखानदार कृषी परवानगी घेण्यासाठी कार्यालयाचा उपयोग करतात व इतर वेळी ते फिरकत पण नाहीत खाजगी किंवा सहकारी कारखानदार मनमानी करत असून यामुळे शेतकरी व सभासदांना एफआरपी पेक्षा जास्त रक्कम मिळत नाही संचालक मंडळाच्या अपुऱ्या ज्ञानामुळे डेबिट किंवा क्रेडिट चा फरक कळत नाही व कारखानदार तोट्यात जातात याची जबाबदारी कारखाना प्रशासक घेत नाही साखर आयुक्तांनी कारखान्याचे चेअरमन व्हाईस चेअरमन, एमडी व संचालक बॉडी कडून प्रतिज्ञापत्र लिहून घ्यावे व एफआरपी थकीत झाल्यास पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल करावेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्ह्यातील थकीत एफ आर पी कारखानदारा वरती कडक कारवाई करुन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असे मत भानुदास सालगुडे पाटील यांनी व्यक्त केले.