तांबवे येथे श्री गोकुळ जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी

तांबवे येथे श्री गोकुळ जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी
संचार वृत्त अपडेट
तांबवे येथे विठ्ठल मंदिरात गोकुळाष्टमी सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याप्रसंगी विठ्ठल मंदिर येथे रात्री बारा वाजता जन्माष्टमी साजरी करण्यात आली दहीहंडी व पाळणा यांचा मोठा कार्यक्रम मंदिरामध्ये साजरा करण्यात आला याप्रसंगी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच हरिभक्त पारायण श्री डांगे महाराज यांचे सुश्राव्य कीर्तन झाले. महाप्रसाद कुलकर्णी परिवाराच्या वतीने देण्यात आला. या प्रसंगी तांबवे येथील सर्व भजनी मंडळ व देवस्थान ट्रस्ट उपस्थित होते मोठ्या दिमाखात कार्यक्रम पार पाडला.
जन्माष्टमी हा केवळ सण नसून त्यावेळी कोणीही आध्यात्मिक आणि कौटुंबिक दृष्टीने बघायला गेल्यास ही शुभ मानले जाते या दिवशी भक्ती भावाने आणि प्रेमाने देवाचे स्मरण केले जाते कल्याणासाठी सकारात्मक बदल निश्चित होतात धार्मिक मान्यतेनुसार अष्टमीची स्थितीचा संबंध 8शी आहे जिला ऊर्जा आणि शाश्वत प्रगतीचे प्रतीक मांडले जाते श्रीकृष्णाने आठव्या मुलाच्या रूपात अवतार घेतल्याने त्याला जीवन न्याय सत्य आणि कर्तव्याचे प्रतीक जाते या भावनेतून गोकुळाष्टमी सर्वत्र उत्साहात साजरी केली जाते