
आमदार उत्तमराव जानकर यांच्या डरकाळीचा पोलिसांनी घेतला घोट
संचार वृत्त अपडेट
श्रीपुर(वार्ताहर)
मी जोपर्यंत माळशिरस तालुक्याचा आमदार आहे तोपर्यंत माळशिरस तालुक्यात एकही अवैध धंदा चालू देणार नाही अशी डरकाळी माळशिरस तालुक्याचे धडाडीचे आमदार उत्तमराव जानकर यांनी फोडली होती विधानसभेत ही आमदार जानकर यांनी माळशिरस तालुक्यातील दोन नंबर धंद्याच्या विरोधात व दोन नंबर धंद्यांना पाठीशी घालणारे पोलिस अधिकारी यांच्या विरोधात आवाज उठवला होता पत्रकार परिषदेत आमदार जानकर यांनी राणाभिमदेवी थाटात गर्जना केली की मी जोपर्यंत माळशिरस तालुक्याचा आमदार आहे तोपर्यंत दोन नंबर धंदे चालू देणार नाही असे असताना केवळ दिड महिन्यात पुन्हा नव्या जोमाने उमेदिने माळशिरस तालुक्यात सर्वच मुख्य शहरात गावात खेड्यात मटका जुगार हातभट्टी दारू गुटखा सुरू झाले आहेत अकलूज शहरात तर भर वस्तीत मुख्य ठिकाणी टपरी मध्ये पाटी लाऊन कल्याण मुंबई मटका राजरोसपणे सुरू आहे आमदार जानकर यांच्या डरकाळी नंतर एक महिना दोन नंबर धंदे काही भागात बंद होते मात्र ते पुन्हा नव्याने सुरू करण्यासाठी पोलिसांनी दोन नंबर धंद्यांना परवानगी देण्यासाठी हप्ते वाढवून घेतले असल्याचे समजते मग हे वाढवून घेतलेले हफ्ते कोणासाठी पोलिसांनी घेतले याची उलट सुलट चर्चा तालुक्यातील जनतेतून खुमासदार पणे होत आहे आमदार जानकर यांना हे पुन्हा दोन नंबर धंदे चालू झाल्याची माहिती मिळाली नाही का असा प्रश्न विचारला जात आहे.