solapur

मिनाक्षी जगदाळे यांचा युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार

मिनाक्षी जगदाळे यांचा युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार

संचार वृत्त अपडेट 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र या विषयात पीएचडी डॉक्टरेट पदवी संपादन करण्याचा मान प्रा. डॉ. मिनाक्षी अमोल जगदाळे यांनी मिळवला आहे. त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल युवासेना जिल्हा प्रमुख गणेश इंगळे यांनी त्यांचा युवासेनेच्या वतीने सत्कार करून गौरव केला.
प्रा. डॉ. जगदाळे यांनी “Competitiveness of Indian Agricultural Exports: Trends and Growth Rate” या विषयावर सखोल संशोधन कार्य पूर्ण केले असून, त्यांच्या संशोधनाचे मार्गदर्शन प्रा. डॉ. ज्ञानदेव मोरे यांनी केले आहे. हे संशोधन भारतीय कृषी निर्यातीच्या स्पर्धात्मकतेचे सध्याचे कल आणि वाढीचा दर यांचा अभ्यास करणारे असून, भविष्यातील धोरणनिर्मितीसाठी उपयुक्त ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
PhD ही त्यांची बारावी पदवी आहे.तसेच प्रा. जगदाळे यांनी सामाजिक कार्यात देखील आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला असून सध्या त्या जिजाऊ ब्रिगेड महाराष्ट्र च्या पुणे विभागीय अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
सत्कार प्रसंगी गणेश इंगळे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले की, “प्रा.डॉ. मिनाक्षी जगदाळे यांनी सातत्य, परिश्रम आणि अभ्यासू वृत्तीच्या जोरावर हे यश मिळवले आहे. आजच्या युवकांसाठी आणि विशेषतः तरुण महिलांसाठी त्या प्रेरणादायी उदाहरण आहेत. यावेळी कल्याण पराडे सचिन ताटे देशमुख भारत पराडे उपस्थित होते

या कार्यक्रमाला विविध सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी डॉ. जगदाळे यांच्या कार्याचा गौरव करत, त्यांच्या पुढील संशोधन व सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

या सत्कारामुळे परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत असून, प्रा. डॉ. जगदाळे यांच्या यशाचा आनंद शैक्षणिक व सामाजिक वर्तुळात साजरा करण्यात आला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button