अकलूज मध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली अडीच लाखांची फसवणुक

अकलूज मध्ये शेअर मार्केटच्या नावाखाली अडीच लाखांची फसवणुक
संचार वृत्त अपडेट
शेअर मार्केटच्या नावाखाली महिलेची २ लाख ६० हजारांची फसवणुक करणाऱ्या महिलेविरुध्द अकलूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अश्विनी दशरथ शहाणे (वय ३९, रा. सुजय नगर, अकलूज, ता. माळशिरस) या महिलेच्या फिर्यादीवरुन स्नेहल संजीव हेंद्रे (वय ३०, रा.यशवंत नगर, ता. माळशिरस) हिच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्नेहल हेंद्रे व अश्विनी शहाणे या दोघी एकमेकींना ओळखतात. २३ नोव्हेंबर २०२३ ते ९ ऑगस्ट २०२५ या कालावधीत स्नेहल हेंद्रे हिने अश्विनी शहाणे यांना शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतविते व मोठा आर्थिक फायदा करून देते असे सांगून शहाणे यांच्याकडून २ लाख ६० हजार रुपये घेतले. ते पैसे शहाणे यांनी परत मागितले असता हेंद्रे हिने उडवाउडवीची उत्तरे दिली. म्हणून अकलूज पोलिस ठाण्यात याबाबत फसवणुक केल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हवालदार साठे पुढील तपास करीत आहेत.