सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) पक्षाच्या मुलाखती संपन्न

सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा पवार) पक्षाच्या मुलाखती संपन्न
माळशिरस तालुका अध्यक्ष पदासाठी राहुल ढेरे-पाटील यांचे पारडे जड
संचार वृत्त अपडेट
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार) पक्षाची बैठक सोलापूर येथे अजित दादा पवार यांचे विश्वासू सहकारी व सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश दादा पाटील यांनी मुलाखती घेतल्या आहेत.त्यावेळी तांबोळी भाई,नागेश चव्हाण,अशोक दादा गायकवाड,वर्षा ताई शिंदे,अभिषेक आव्हाड आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी जिल्यातील अकरा तालुक्यातील सुमारे एक हजार ते दिड हजार कार्यकर्ते उपस्थित होते.त्यातील काही जणांनी तालुका अध्यक्ष,शहर अध्यक्ष,विधान सभा अध्यक्ष,निरीक्षक आदी पदाच्या मुलाखती पार पडल्या आहेत.विशेष म्हणजे या मुलाखती दरम्यान काहींनी वाजत गाजत शक्ती प्रदर्शन केले.त्यामुळे सदर पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.हे मात्र खरे असले तरी माळशिरस तालुक्यातील राजकीय वातावरण वेगळे होते व आहे. माळशिरस तालुक्यातील राजकीय परिस्थितीत प्रस्थापितांच्या विरोधात लढणे साधी बाब नाही तसेच अकलूज सारख्या ठिकाणी अगोदर शंभर ते दोनशे मते विरोधकांना मिळत होती.परंतु परवाच्या लोक सभेच्या आणि विधान सभेच्या निवडणुकीत अंदाजे सहा हजार व नऊ हजार मत विरोधकांना मिळाली असून यामध्ये सिंहाचा वाटा हा अजित दादा पवार गटाचे जेष्ठ नेते अशोक दादा गायकवाड,राहुल ढेरे पाटील,राजीव गायकवाड आणि मित्र पक्षांना आहे.त्यामुळे प्रस्थापितांच्या पायांची वाळू घसरू लागली आहे.यांनी पक्षाची ध्येय धोरणे माळशिरस तालुक्यातील शेतकरी,शेतमजूर,कष्टकरी तसेच शेवटच्या घटकापर्यंत अजित दादा पवार यांचे विचार पोहचविले आहेत. त्यामुळे माळशिरस तालुक्यातील सदर पक्षाच्या कार्यकर्त्याची पूर्ण राजकीय ताकत या पक्षाचे माळशिरस तालुका कार्याध्यक्ष राहुल ढेरे पाटील यांच्या पाठीशी असून त्यांना माळशिरस तालुका अध्यक्ष करण्यासाठी तालुक्यातील सर्वच कार्यकर्त्यांनी विडा उचलला असल्याचे दिसून येत आहे.तसेच अकलूज नगरपरिषद निवडणूका जवळ आल्या असून तालुका अध्यक्ष पद अकलूजला राहुल ढेरे-पाटील यांच्या रूपाने मिळाले तर पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.