solapur

माळेगाव’ ने गतवर्षीचा अंतिम दर 3651/ रु. जाहीर करावा शरद पवार गटाकडून निवेदन

माळेगाव’ ने गतवर्षीचा अंतिम दर 3651/ रु. जाहीर करावा शरद पवार गटाकडून निवेदन

संचार वृत्त अपडेट 

माळेगाव साखर कारखान्याच्या २०२४- २५ गळीत हंगामासाठी ऊस उत्पादक सभासदांनी ३६५१ रुपयांचा अंतिम दर जाहीर करावा, अशी मागणी कारखान्याचे चेअरमन आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली आहे. ही मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने करण्यात आली असून, कार्यकारी संचालक अशोक पाटील यांनी ती औपचारिकपणे स्वीकारली आहे.

मागील हंगामाच्या तुलनेत यंदा साखर विक्रीत प्रति किंटल सुमारे ६० रुपयांची वाढ नोंदवली गेली आहे. याशिवाय, कारखान्याच्या व्यवस्थापनाने खरेदी, वाहतूक आणि इतर खर्चामध्ये काटकसर करत ७ ते ८ कोटी रुपयांची बचत साधली आहे. ही बचत आणि वाढलेला साखर दर लक्षात घेता, अंतिम ऊसदर अधिक लाभदायक ठरण्याची शक्यता सभासद व्यक्त करत आहेत.

माळेगाव कारखान्याला को-जेन आणि इतर उपपदार्थांमधूनही चांगले उत्पन्न मिळाले आहे. त्यामुळे सभासदांचा विश्वास आहे की, राज्याच्या अर्थव्यवस्थेचा भार सांभाळणाऱ्या अजित पवार यांनी यंदा सभासदांची दिवाळी गोड करावी, आणि मागील हंगामापेक्षा अधिक दर जाहीर करावा. सध्या कारखान्याने २०२४ २५ हंगामासाठी ३३३२ रुपये प्रति टन दराने आगाऊ रक्कम सभासदांच्या खात्यावर वर्ग केली आहे. मागील वर्षी २०२३- २४ मध्ये माळेगाव कारखान्याने ३६३६ रुपयांचा उच्चांकी दर दिला होता, ज्याचे कौतुक राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात जाहीरपणे केले होते. अजित पवार हे सध्या माळेगाव कारखान्याचे चेअरमन म्हणून कार्यरत आहेत. त्यामुळे अंतिम दर ३६५१ रुपये जाहीर होतो का, याकडे सर्व सभासदांचे आणि ऊस उत्पादकांचे लक्ष लागले आहे. हा निर्णय केवळ आर्थिक नव्हे, तर सभासदांच्या विश्वासाचा आणि दिवाळीच्या आनंदाचा प्रश्न ठरणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button