स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण संघटनेच्या उपाध्यक्षपदी श्यामसुंदर भागवत यांचे नियुक्ती

स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण संघटनेच्या उपाध्यक्षपदी श्यामसुंदर भागवत यांची नियुक्ती
संचार वृत्त अपडेट
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण संघटनेच्या अकलूज शहर उपाध्यक्षपदी श्यामसुंदर भागवत यांची नियुक्ती झाल्याबद्दल फेटा,शाल, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला व भावी वाटचालीस शुभेच्छा देऊन त्यांचे अभिनंदन केले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार चंद्रकांत कुंभार (तरुण भारत) ,भारत मगर (दिव्य मराठी) , लक्ष्मीकांत कुरुडकर (संचार वृत्त) अकलूज शहराध्यक्ष सुधीर शहाणे (सावली हॉटेल चालक) व माळशिरस तालुका अध्यक्ष संजय बडे ई. मान्यवर उपस्थित होते.
स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दीपक कांबळे व संस्थापक तथा मुख्य महासचिव मुख्य महासचिव कमलेश शेवाळे तसेच महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष धनश्री उत्पात यांच्या नेतृत्वाखाली व सर्व विश्वस्त संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली अकलूज शहर अध्यक्ष सुधीर शहाणे यांनी उपाध्यक्षपदी श्यामसुंदर भागवत यांची नियुक्ती केली आहे. सोलापूर जिल्हाध्यक्ष चंद्रकांत वेदपठक यांनी जाहीर केली. शहर व परिसरात त्यांचे स्वागत होत असून अकलूज शहर व परिसरात त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.



