solapur

अकलूज शहरात कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच

अकलूज शहरात कधी संततधार तर कधी मुसळधार पाऊस दिवसभर पावसाची रिपरिप सुरूच

संचार वृत्त अपडेट 

अकलूज शहर व परिसरात शुक्रवारी दिवसभर वादळी वाऱ्यासह पावसाची रिपरिप सुरूच होती, कधी मुसळधार तर कधी संततधार पावसाने  जनजीवन विस्कळीत झाले.गुरुवारी रात्रीदेखील शहराच्या काही भागात सुरुवातीला मुसळधार व नंतर रिमरिम पाऊस झाला होता. त्यानंतर रात्रभर अधूनमधून कमी-अधिक पावसाच्या सरी कोसळल्या. त्यानंतर शुक्रवारी सकाळी मात्र पश्चिम बंगाल येथे कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने उद्या (शनिवारी) व रविवारी माळशिरस तालुक्यासह काही तालुक्यांना रेड अलर्ट देण्यात आला असून शनिवारी दुपारी दोननंतर ते रविवारी सकाळी सहावाजेपर्यंत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.यावेळी वादळी वारेदेखील वाहात होते. त्यामुळे कधी मुसळधार तर कधी हलका पाऊस दुपारपर्यंत सुरूच होता. या पावसामुळे शहरातील सखल भागात पाणी साचले. त्यातूनच वाहनधारकांना मार्गक्रमण करावे लागले. पाऊस थांबण्याचे नाव न घेतल्याने घराबाहेर पडताना नागरिकांना रेनकोट, टोप्या, छत्र्या यांचा आधार घ्यावा लागला.दिवसभराच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पुन्हा रात्री दहानंतर उशिरापर्यंत पावसाची रिपरिप सुरूच होती.सततच्या पावसामुळे शहरातील रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून वाहनधारकांचे हाल होत आहेत. शहराच्या हद्दवाढ भागामध्ये सलग होत असलेल्या पावसामुळे जागोजागी पाणी साचून दलदल निर्माण झाली आहे. पक्के रस्ते नसलेल्या नागरी वस्त्यांमध्ये नागरिकांचे फारच हाल होत आहेत. या पावसाळी वातावरणामुळे साथीचे रोग पसरण्याची भीती व्यक्त होत आहे. गेल्या आठ दिवसांपासून कमी-अधिक प्रमाणात दररोज पावसाने हजेरी लावली आहे. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून सायंकाळी घराबाहेर पडणे मुश्कील बनले आहे. शहरातील अनेक भागात अद्याप पावसाचे पाणी ओसरलेले नाही. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

आज मुसळधार पावसाचा अंदाज

आज दिवसभर पाऊस अधून मधून सुरू राहील दुपारनंतर ढग दाटून येतील आणि काही भागात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे व संध्याकाळ नंतर अतिशय मुसळधार पाऊस होईल 

रमेश जाधव (विज्ञान हवामान केंद्र, माळशिरस)

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button