solapur

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक काशिनाथ डांगे (गुरुजी) यांचे निधन

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ स्वयंसेवक काशिनाथ डांगे (गुरुजी) यांचे निधन

संचार वृत्त अपडेट 

अकलूज येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक,ऋषितुल्य व्यक्तिमत्व काशिनाथ शामराव डांगे (गुरुजी) यांचे वार्धक्याने निधन झाले.ते विविध सामाजिक संस्थांशी संबंधित होते.अकलूज येथील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज सत्संग मंडळ,रामकुटी संग्रामनगरचे अध्यक्ष होते तसेच ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील वडगावकर दिंडीचे ते सचिव होते.तसेच अकलूज ब्राह्मण सेवा संघ व गणपती मंदिर ट्रस्टचे सचिव म्हणून त्यांनी काम पाहिले.राऊतनगर येथील प्राथमिक शाळेत अनेक वर्षे मुख्याध्यापक होते तसेच अकलूज मधील महावीर जैन शाळेचे सुद्धा ते अनेक वर्षे मुख्याध्यापक म्हणून सेवा केली.मृत्यू समयी त्यांचे वय ९७ वर्षाचे होते.त्यांचे पश्चात पत्नी दोन मुले,दोन मुली,सुना,जावई नातवंडे, परतवंडे असा परिवार आहे त्यांच्यावर काल रात्री अकलूज येथे स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले सदर प्रसंगी सर्व क्षेत्रातील व विविध समाजातील बांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button