solapur

अकलूज मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर भावी उमेदवारांचे ‘स्टेट्स’ ‘व्हाट्सअप’ बार फुटू लागले जनतेला उमेदवाराची उत्सुकता

अकलूज मध्ये दिवाळीच्या मुहूर्तावर भावी उमेदवारांचे ‘स्टेट्स’ ‘व्हाट्सअप’ बार फुटू लागले जनतेला उमेदवाराची उत्सुकता

संचार वृत्त अपडेट 

एरवी फोनला प्रतिसाद न देणारे व भेटीस टाळाटाळ करणारे अकलूज नगरपरिषदेचे माजी सत्ताधारी आगामी होऊ घातलेल्या अनुषंगाने विविध पक्षाचे स्थानिक नेते सक्रिय झाल्याचे चित्र शहरातील कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांना जेवणावळी देऊन गोंजारताना पहावयास मिळत आहे.

डिजिटल मिडियाचा वापर करीत आजी-माजी आणि भावी उमेदवार हे समाज माध्यमातून निवडणूकीच्या माध्यमांतून ‘स्टेटसवर’ फोटोसह प्रभाग क्रमांक टाकून डिजिटल जाहिरात करताना दिसून येत आहेत.लॉक डाऊनच्या काळात अंडरग्राउंड झालेले हेच नेते आता ऐक्टीव्ह मोडमध्ये येऊन पाणी प्रश्न, भुयारी गटार, रस्ते, पथदिवे, स्म शानभूमी. शौचालये. स्वच्छता. वाहने खरेदी या कामातून इतरांनी केलेल्या ‘देवाण घेवाणी’ची आकडेवारी सांगत आपला ‘कर्मट’ इतिहास पुसण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत. परिणामी ही निवडणूक जिंकणे इतके सोपे राहिले नसल्याचे बोलले जात आहे. नगराध्यक्ष पद हे थेट जनतेतून निवडले जाणार असून, नगराध्यक्षांना शासनाने दिलेले अधिकार पाहता या पदावर जो कोणी उमेदवार विराजमान होईल.त्याच्यांच हातात पालिकेच्या कारभाराची चावी असेल. यामुळे विविध पक्ष तसेच पार्टी प्रमुखांनी वजनदारत उमेदवारांची ‘घर भेट’ घेऊन विनवणी करण्याची स्पर्धा सध्या सुरू झाल्याची चर्चा जोरात रंगू लागली आहे.

अन्यथा जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल !

तत्कालीन सत्ताधाऱ्यांसह विरोधकांनी प्रशासनाला हाताशी धरून शहरात कोटींची उड्डाणे घेऊन केलेला विकास पाहता नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवारांनी कुठल्या पक्षातून आणि कोणत्या पार्टी लीडरचे तिकीट घ्यायचे. आपण जनतेच्या विश्वासावर मिळवलेल्या सत्तेचा हेच पार्टी लीडर गैरवापर करून आपलेही ‘अस्तित्व’ नेस्तनाबूत करतील अशी भितीही भावी नगराध्यक्ष बाळगून आहेत. नगरसेवक / नगराध्यक्ष उमेदवारांना सारासार विचार करूनच हिताचा निर्णय घ्यावा लागणार आहे. अन्यथा जनतेच्या प्रचंड रोषाला सामोरे जाऊन प्रसंगी पराभव पत्करावा लागेल. अशी चर्चा अकलूज शहरातील बहुतांश वॉर्डातील नागरिकांच्या तोंडून ऐकावयास मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button