अकलूजमध्ये पारंपरिक म्हशी पळविण्याची स्पर्धा उत्साहात संपन्न

अकलूजमध्ये पारंपरिक म्हशी पळविण्याची स्पर्धा उत्साहात संपन्न
संचार वृत्त अपडेट
अकलूज येथे समस्त गवळी समाजाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने पारंपरिक म्हशी पळविण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या अनोख्या स्पर्धेला परिसरातील शेकडो गवळी बांधव आणि हजारो रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.या कार्यक्रमाला अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शिवतेजसिंह मोहिते-पाटील प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
पारंपरिक वाद्यांच्या गजरात म्हशींना रंगीबेरंगी वस्त्रे, फुलांचे हार आणि घंटा लावून सजविण्यात आले होते.

स्पर्धेदरम्यान गवळी समाजातील युवकांनी आपल्या म्हशींना रस्त्यावरून पळवत नेले, तर प्रेक्षकांनी टाळ्यांच्या गजरात स्पर्धेचा आनंद लुटला. या स्पर्धेच्या माध्यमातून गवळी समाजाने आपली परंपरा आणि संस्कृती जपण्याचा सुंदर प्रयत्न केला आहे.



