solapur

मानव संरक्षण संघाच्या वतीने गरजूंना दिवाळी फरार वाटप

मानव संरक्षण संघाच्या वतीने गरजूंना दिवाळी फरार वाटप

संचार वृत्त अपडेट 

अकलूज येथे पाडव्या सणा निमित्ताने अकलूज शहरातील गोरगरिब भटकंती करणाऱ्या लोकांना नवीन ड्रेस कपडे वाटप करण्यात आले सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघ वर्षभर विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात समाजातील गोरगरीबावरील होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात आवाज उठवतात शासना कडून व शासकीय यंत्रणे कडून मानवी हक्काचे व मानवाधिकाराचे उल्लंघनाविरोधात ही संघ संस्था काम करत असते या सामाजिक कल्याण एवं मानव संरक्षण संघाच्या वतीने अनेक गोरगरीब पीडित अन्याय अत्याचार झालेला लोकांना शासन दरबारात कायदेशीर पाठपुरावा करून या संस्थेने अनेकांना न्याय मिळवून दिला आहे या कार्यक्रमाचे मार्गदर्शक राष्ट्रीय अध्यक्ष राजेश भाई कुंभारे व राष्ट्रीय उपाध्यक्ष तेजस भाई परमार पश्चिम भारत अध्यक्ष अमोल माने यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. यावेळी उपस्थित पश्चिम भारत अध्यक्ष अमोल बाळासाहेब माने, संग्राम नगर शहर विभाग अध्यक्ष रोहित टेके. जेष्ठ नागरिक मोहन पालखे,. सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा शुभांगीताई मोरे.सोलापूर जिल्हा महिला उपाध्यक्षा अश्विनीताई पांढरे,माळशिरस तालुका महिला अध्यक्षावंदनाताई तिकोटे उपस्थित होते

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button