solapur

आम्ही प्रचार करायचा कोणत्या पक्षाचा? कार्यकर्ते संभ्रमात ; इच्छुकांचा पक्ष ठरेना

आम्ही प्रचार करायचा कोणत्या पक्षाचा?   

 कार्यकर्ते संभ्रमात ; इच्छुकांचा पक्ष ठरेना

संचार वृत्त अपडेट 

अद्याप तारीख जाहीर झाली नसली तरी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूकीची रणधुमाळी जोरात सुरू झाली आहे. उमेदवारी गृहीत धरूनच संभाव्य उमेदवारांनी लोक संपर्कासाठी अक्षरशः पायाला भिंगरी बांधली आहे. मात्र अनेक इच्छुकांचा अद्याप पक्ष ठरलेला नाही. काही इच्छुक ऐनवेळी कोणत्याही पक्षाच्या चिन्हावर लढण्याच्या तयारीत आहेत. अशी राजकीय परिस्थिती माळशिरस तालुक्यात दिसून येत आहे त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे नेमकं आम्ही कोणत्या पक्षाचा प्रचार करायचा? असा प्रश्नही कार्यकर्त्याकडून विचारला जात आहे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुककडून जोरदार तयारी सुरू आहे.
मतदार संघाच्या पुनर्रचनेसह आरक्षणाची सोडत ही झाल्याने निवडणुकांच्या तारखा कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे.राज्यातील बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे या निवडणुकीतील माळशिरस तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलली आहेत.
गेल्या निवडणुकीत परस्पर विरोधात लढलेले या निवडणुकीत एकत्र आले तर आश्चर्य नसावे. अशी चर्चा जनमानसात होत आहे तरीसुद्धा गेल्या काही महिन्यापासून जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या मतदार संघाचे इच्छुकाकडून मशागत सुरू आहे त्यामुळे महायुती व महाविकास आघाडीच्या निमित्ताने एकत्र आलेले हे परस्पर विरोधात शड्डू ठोकण्याच्या तयारीत आहेत. आज नेत्यांची आघाडी म्हणून स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीत एकत्र लढण्याची चर्चा सुरू असली तरी इच्छुकांची संख्या लक्षात घेता स्वबळाची ही तयारी केली आहे अद्याप निवडणुकीच्या निवडणुकीच्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत त्यामुळे नेते मंडळींनी सावध भूमिका घेतली आहे. उमेदवारीचा कोणालाही शब्द दिलेला नाही. मात्र या निवडणुकीतील बंडखोरी रोखण्यासाठी अनेकांना राजकीय सत्ता पदांचे आमिष दाखवले जात आहे यातूनही बंडखोरी झालीच तर अनेक  मैत्रीपूर्ण लढती ही पाहायला मिळणार आहेत. आघाडी अंतर्गत जागा वाटपाचा तिढा वाढणार असल्याने अनेक इच्छुकांनी कोणत्या पक्षाच्या चिन्हावर लडायचे हे जाहीर केलेले नाही मात्र निवडणूक लढाईचीच हे निश्चित करूनच संपर्क दौरे सुरू केले आहेत मतदारसंघ कोणत्या पक्षाकडे जाणार याचा अंदाज घेऊनच ऐनवेळी संबंधित पक्षाची उमेदवारी मिळवायची अशी तयारीही काही इच्छुकांनी केली आहेत त्यामुळे या इच्छुकांच्या कार्यकर्त्यासह पक्षीय कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. आम्ही नेमकं कोणत्या पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायचा? असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे
चिन्ह घेऊनच पक्षांतर-
इच्छुकांची संख्या लक्षात घेता दोन्ही आघाडी अंतर्गत पक्षांतरलाही ऊत येणार आहे जागा वाटपात कोणता गण,गट कोणत्या पक्षाच्या वाटणीला जाणार याकडेही इच्छुकांच्या नजरा लागून राहिल्या आहेत पक्षीय ताकद लक्षात घेऊनच संबंधित पक्षाच्या उमेदवारीसाठी अनेकांचे प्रयत्न सुरू झाले आहेत यातून पक्ष प्रवेशा ऐवजी ऐनवेळी चिन्ह घेऊनच अनेकांनी पक्षांतराची तयारी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button