solapur

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राम सातपुते यांची कसोटी तर मोहिते पाटील यांच्या निर्णयाची उत्सुकता

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत राम सातपुते यांची कसोटी तर मोहिते पाटील यांच्या निर्णयाची उत्सुकता

संचार वृत्त अपडेट 

होणार होणार म्हणून स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूका अखेर आज जाहीर झाल्यानंतर माळशिरस तालुक्यातील राजकारण समाजकारण ढवळून निघाले आहे कार्यकर्त्यांनी आपले देव पाण्यात घालून आपल्यालाच उमेदवारी कशी मिळेल याचा राजकीय लेखा जोखा मांडण्याचा प्रयत्न करत आहेत गेली अनेक वर्षे या ना त्या कारणाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रेंगाळत ठेवल्या होत्या पण आज राज्य निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील नगरपंचायतीच्या नगरपरिषद महानगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद निवडणुकांचे बिगुल वाजवले आहे त्यामुळे राज्यातील निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे या राजकीय धुमश्चक्री मध्ये भाजपाने साम दाम दंड भेद ही निती वापरून अनेक नेते कार्यकर्ते यांना त्यांच्या पक्षात प्रवेश देऊन प्रस्थापित पक्षांना खिंडार पाडले आहे नेते कार्यकर्ते यांना भाजपमध्ये प्रवेश देऊन राज्यात भाजप स्व बळावर सत्तेत कसा येईल याची व्युहरचना आखली आहे दुसर्यांची मोडतोड करून खिंडार पाडून स्वतःची सत्तेत ताकद वाढवण्याचा भाजपच्या या खेळीला जनतेत कितपत प्रतिसाद मिळतो आहे हे पहाणे उचित ठरेल माळशिरस तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये माळशिरस तालुक्याचे माजी आमदार रामभाऊ सातपुते यांना उमेदवार निवडीचे सर्व अधिकार दस्तुरखुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत मात्र राम सातपुते हे माळशिरस तालुक्यात लादलेल नेतृत्व आहे त्यामुळे माळशिरस तालुक्यात प्रस्थापित नेतृत्व म्हणून गेली साठ ते सत्तर वर्षे इथे सामाजिक राजकीय सांस्कृतिक शैक्षणिक वैचारिक कृषी औद्योगिक क्षेत्रात मजबूत स्थान असलेल्या मोहिते पाटील यांचे या राजकीय सामाजिक ताकदीमुळे लादलेल्या नेतृत्वाचा कितपत टिकाव लागतो या बाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे माळशिरस तालुक्यात व सोलापूर जिल्ह्यातील काही तालुक्यांत अशी गाव शहर व पंचायत समिती गण जिल्हा परिषद गट असे आहेत की मोहिते पाटील ठरवतील तोच उमेदवार कार्यकर्ता नेता निवडून येऊ शकतो त्यामुळे मोहिते पाटील हेच नेतृत्व तोच पक्ष तेच आमचे सर्वेसर्वा अशी स्थिती आहे या सर्व घडामोडींवर लादलेल्या नेतृत्वाची स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये कसोटी लागणार आहे या एकंदरीत वातावरणात एकीकडे अशी दोलायमान वस्तुस्थिती आहे तर माळशिरस तालुक्यातील व जिल्ह्यातील काही बडे नेते कार्यकर्ते हे भाजपात डेरेदाखल झाले आहेत त्यामुळे मोहिते पाटील हे त्यांच्या ताकदीचा एकतर्फी किल्ला कसा लढवतात याचीही उत्सुकता निर्माण झाली आहे माळशिरस तालुक्यातील जाणकार नेतृत्व व राजकारणातील किंग मेकर जयसिंह उर्फ बाळदादा यांनी गेल्या काही दिवसांपुर्वी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचे नेतृत्वाखाली निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले आहे मात्र भाजपने त्यांच्या या भुमिकेचे कसलेही समर्थन किंवा स्वागत केले नाही उलटपक्षी त्यांचे प्रतिस्पर्धी विरोधक माजी आमदार रामभाऊ सातपुते यांनाच माळशिरस तालुक्यातील उमेदवार निवडीचे अधिकार दिल्याने मोहिते पाटील गटात नाराजी व गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे या सर्व परिस्थितीत आता मोहिते पाटील अचानक काय निर्णय घेऊ शकतात की स्थानिक आघाडी करून निवडणूकांना सामोरे जातात याची कमालीची उत्सुकता निर्माण झाली आहे मात्र या सर्व राजकीय गोंधळात मोहिते पाटील गटातील वरिष्ठ नेते कार्यकर्ते यांनी कसलीही अद्याप प्रतिक्रिया दिली नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button