ऊस दर जाहीर न झाल्यास कारखाना संचालकांच्या घरासमोर होणार आंदोलन

ऊस दर जाहीर न झाल्यास कारखाना संचालकांच्या घरासमोर होणार आंदोलन
संचार वृत्त अपडेट
सोलापूर जिल्ह्यातील कारखान्यांनी जर चालू गळीत हंगामातील व सुदर जाहीर नाही केला तर संचालकांच्या दारात हलगी नात आंदोलन करण्याचा ठराव रयत क्रांती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुहास पाटील यांनी ऊस परिषदेत केला.
ना पक्षाचा ना नेत्याचा ना जातीचा लढा फक्त शेतकरी एकजुटीचा या तत्त्वावर टेंभुर्णी येथे ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते या परिषदेसाठी रयत क्रांती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सागर खोत राज्य कार्याध्यक्ष दीपक भोसले बळीराजा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष माऊली जवळगेकर माजी कृषी सभापती संजय पाटील माळशिरसचे शेतकरी नेते भानुदास सालगुडे पाटील पंढरपूरचे समाधान फाटे भाजपचे निवृत्ती तांबवे रयत क्रांतीचे पुणे जिल्हाध्यक्ष निलेश देवकर वेळापूरचे गोपाळ घाडगे देशमुख, माळशिरस तालुका राष्ट्रवादी कार्याध्यक्ष (अजित पवार) गटाचे राहुल ढेरे,रयत क्रांतीचे राज्य प्रवक्ते राहुल बिडवे, श्रीमंत केचे विश्वजीत पाटील उपस्थित होते.यावेळी पुढे बोलताना सुहास पाटील म्हणाले सोलापूर जिल्ह्यातील एका कारखान्याने फक्त दर जाहीर केलेला आहे बाकी कारखान्यांनी दर जाहीर केलेला नाही त्यामुळे शेतकरी संभ्रमावस्थेत आहे आमचा लढा हा केवळ पक्ष नेता जात यासाठी नसून शेतकरी एकजुटीचा म्हणजेच शेतकऱ्यांच्या फायद्याचा आहे जे कारखाने दर जाहीर करत नाहीत त्या कारखान्याच्या संचालकांच्या घरासमोर हलगीनाथ आंदोलन करण्यात येणार आहे जेणेकरून संचालकांनी आपल्या अध्यक्षाला जाग आणावे व शेतकऱ्यांसाठी ऊस दर जाहीर करायला लावावा ही या मागची भूमिका आहे यावेळी सागर खोत यांनीही आपले भूमिका स्पष्ट केली.



