solapur

चंद्रप्रभू स्कूलचे मुख्यमंत्र्यांना रस्त्ता दुरुस्तीसाठीचे निवेदन  तात्काळ खड्डेमय रस्ता दुरुस्त करून गैरसोय दूर करावी ; नरेंद्र गांधी 

चंद्रप्रभू स्कूलचे मुख्यमंत्र्यांना रस्त्ता दुरुस्तीसाठीचे निवेदन 

तात्काळ खड्डेमय रस्ता दुरुस्त करून गैरसोय दूर करावी ; नरेंद्र गांधी 

संचार वृत्त अपडेट 

चंद्रप्रभू इंग्लिश स्कूलने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे नातेपुते – पिरळे रस्ता दुरुस्ती साठी पत्राद्वारे मागणी केली आहे.नातेपुते पिरळे या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झालेली आहे. रस्यावर अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्याच्या दुरुस्तीस गतवर्षी सुरुवात झाली होती. त्यावर फक्त खडीकरणाचा थर झालेला होता. त्यानंतर काम स्थगित झाले. आता त्या रस्त्याची झालेली अवस्था पूर्वीपेक्षा भयंकर झालेली आहे.या रस्त्यालगत चंद्रप्रभू इंग्लिश मेडियम प्रशाला असून रोज किमान हजारो विद्यार्थी व पालक शाळेसाठी ये-जा करत असतात, अनेक छोटे मोठे अपघात दररोज होत असतात.

तसेच या रस्त्यालगत पालखी मैदान, व्यापारी पेठ, नवीन वसाहती व शेती परिसर अशी अनेक रहदारीची ठिकाणे आहेत. यामुळे विद्यार्थी, पादचारी व वाहन चालकांच्या सूरक्षिततेलाही धोका निर्माण झाला आहे. परंतु अद्याप प्रशासनाकडून रस्ता दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही.मुख्यमंत्र्यांनी स्वतः या रस्ता दुरुस्तीबाबत तातडीने लक्ष घालून संबंधित विभागाला योग्य कारवाईचे निर्देश द्यावेत. तुमच्या त्वरित कार्यवाहीमुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक, व नागरिकांची गैरसोय दूर होईल.अशा प्रकारे मागणीचे पत्र एकमताने चंद्रप्रभू एज्युकेशन संस्थेने मुख्यमंत्री सह संबंधित लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले आहे. शिवाय यासोबत शेकडो पालकांच्या सह्यांचे निवेदन सुद्धा सादर केले असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन नरेंद्र गांधी यांनी दिली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button