अकलूज न.प.पहिला नगराध्यक्ष पदाचे मानकरी कोण होणार ? बुलेट ची लागली पैज

अकलूज न.प.पहिला नगराध्यक्ष पदाचे मानकरी कोण होणार ?
बुलेट ची लागली पैज
संचार वृत्त अपडेट
अकलूज नगरपरिषदेची पहिलीच पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पाडली आहे.या निवडणूकीत भारतीय जनता पक्ष,राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्ष यांच्यात चुरशीची निवडणुक झाली आहे.२१ डिसेंबरला निकाल जाहीर होणार असून त्यामुळे माळशिरस तालुक्यासह सोलापूर जिल्हाचे लक्ष नगराध्यक्ष पदाची माळ कोणत्या पक्षाच्या उमेदवाराच्या गळ्यात पडणार याकडे तालुक्यातील कार्यकर्त्यांना लागून राहिले आहे.
अकलूज नगरपरिषदेची पहिली पंचवार्षिक निवडणुकीची मतदानाची प्रक्रिया दि.२ डिसेंबर २०२५ रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर दि.३ डिसेंबर रोजी मत मोजणी होणार होती पण राज्यातील इतर नगरपरिषदेच्या होणाऱ्या निवडणुकीनंतर २१ तारखेला होणार असल्यामुळे अकलूज नगरपरिषद निवडणुकीच्या निकालाची तालुक्यात चर्चा जिल्हाभर होवू लागली आहे.
या निवडणुकीत मतदारांना भरपूर लक्ष्मी दर्शन झाल्यामुळे तेरी भी चूप और मेरी चूप…! अशी अवस्था मतदार व कार्यकर्त्यात झाली आहे.या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा उमेदवार की राष्ट्रवादी शरद पवार गट उमेदवार नगराध्यक्षपदी विजयी होणार यावर माळशिरस तालुक्यात गोरडवाडी येथे भाजपा समर्थक दादा तरंगे,तरंगफळ व राष्ट्रवादी शरद पवार गट समर्थक मच्छिंद्र कर्णवर गोरडवाडी या दोन पाहुण्यात बुलेट गाडीची पैज लागली आहे.राष्ट्रवादी शरद गटाचे पवार नगराध्यक्ष झाल्यास दादा तरंगे यांनी मच्छिंद्र कर्णवर यांना बुलेट गाडी द्यायची तर भाजपचा नगराध्यक्ष झाल्यास मच्छिंद्र कर्णवर यांनी दादा तरंगे यांना नवीन बुलेट गाडी द्यायची अशी पैज लागली आहे.भाजप समर्थक दादा तरंगे यांनी २१ तारखेला अकलूजमध्ये कमळ फुलणार असून भाजपचा नगराध्यक्ष होणार असल्याचे ठामपणे सांगितले तर राष्ट्रवादी शरद पवार समर्थक मच्छिंद्र कर्णवर यांनी दादा तरंगे यांना तुम्ही स्वप्नात आहात.अकलूज नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी शरद पवार गट तुतारीचाच नगराध्यक्ष निश्चित होणार असल्याचे ठामपणे सांगून या निवडणुकीत नगराध्यक्षपदाच्या विजयाची खात्री देऊन समर्थक पाहुण्यांनी एकमेकांना पैज लावली. बुलेट गाडी देण्याची पैज लावल्याचा व्हिडीओ सध्या तालुकाभर सर्वत्र प्रसार माध्यमातून प्रसारित झाला आहे.



