solapur

अकलूज चा ‘पॅनल टू पँनल’ फॉर्मुला उधळला उच्चांकी मतदान कोणाला तारणार? कोणाला मारणार?

अकलूज चा ‘पॅनल टू पँनल’ फॉर्मुला उधळला

उच्चांकी मतदान कोणाला तारणार? कोणाला मारणार?

संचार वृत्त अपडेट 

अकलूज नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी ६९.३५ टक्के मतदान झाले. ३४४०७ पैकी २३८१७ मतदान झाले. उच्चांकी मतदान कोणाला मारणार कोणाला तारणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. ही निवडणूक विक्रमी मतदानाने ऐतिहासिक ठरली असून निवडणूक भाजप,राष्ट्रवादी शरद पवार गट,राष्ट्रवादी अजित पवार गट,अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली निवडणुकीत क्रॉस वोटिंग मात्र मोठ्या प्रमाणात झाले आहे.त्यामुळे पॅनल टू पँनल मतदानाचा फॉर्मुला उधळला गेला आहे.
पक्षप्रवेश,डावपेच,आरोप प्रत्यारोप, लक्षवेधी कोपरासभा,विकास कामाचा दावा,मंत्र्यांच्या सभा, आदींनी निवडणूक गाजली सुरुवातीला शांततेत असलेली निवडणूक शेवटच्या टप्प्यात शेवटचे दोन दिवस अत्यंत संवेदनशील बनली. कांहीं प्रभागात वादावादीचे प्रकार घडले एकमेकांना शिवीगाळ आणि अंगावर धावून जाणे धमकी देण्याचे प्रकार घडले.सर्व पक्षांनी एक एक मत केंद्रस्थानी ठेवल्याने काटेकी टक्कर दिसून आली. याचवेळी दगाफटका होऊ नये यासाठी नेत्यांनी काळजी घेतली होती. तसेच आपल्या कार्यकर्ता अथवा गाव पुढाऱ्याकडून गद्दारी होणार नाही याकडेही बारकाईने लक्ष ठेवले होते.

नगरपरिषद निवडणुकीत तरुणाईमुळे मतदानाच्या टक्केवारीत वाढ झाली असून वाढलेली टक्केवारी कोणाला धक्का देणार कोणाला लाभदायी ठरणार? याची उत्सुकता शहरातील नागरिकांना लागली आहे. नगरपरिषदेच्या निकालाचा अंदाज सर्वांसाठी कठीण झाला आहे. निवडणूक निकाल 21 डिसेंबर रोजी असल्याने उमेदवारांची धाकधूक दिवसेंदिवस वाढत आहे. शहरातील मतदारांनी मोठ्या उत्साहात मतदानाचा हक्क बजावला आहे. वाढलेल्या टक्केवारीमुळे कोणाला लाभ होणार कोणाला फटका बसणार अशी चर्चा शहरातील मतदारात सुरू आहे. कमळ,तुतारी का घड्याळ? प्रत्येकाच्या तोंडी हेच वाक्य चर्चिले जात आहे. नगरपरिषद निवडणुकीत भाजप विरुद्ध सुतारी व घड्याळ यांच्यात चुरशीची लढत झाली आहे. या पक्षाच्या नेत्यांनी निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे.
काही प्रभागात मतदारांनी मतदान यंत्रावर ‘वर एक तर खाली दुसऱ्याला’ अशा पद्धतीने मतदान करून सहकार्य केल्याची चर्चा गुप्त सुरात निघत आहे.त्यामुळे प्रभागातील चित्र वेगळेच दिसणार का?अशी चर्चा शहरात ऐकावयास मिळत आहे. नगरपरिषद निवडणुकीत कोणत्या उमेदवाराचे कोणत्या प्रभागात वर्चस्व आहे हे दिसून येणार आहे. या झालेल्या निवडणुकीत कोणामुळे कोणाला फटका बसणार? हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. नगराध्यक्ष पद कोणाकडे जाणार उमेदवारांचे भवितव्य यंत्रात बंद झाले आहे.येणाऱ्या 21 डिसेंबरला कोण विजयी होणार कोणाचा पराभव होणार कोणत्या प्रभागाने कोणाला धोका दिला.याचे चित्र स्पष्ट होणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button