solapur

ओंकार (ता.माळशिरस) कारखान्याकडून एकूण दर व पहिली ऊचल जाहीर

ओंकार (ता. माळशिरस) कारखान्याकडून एकूण दर व पहिली ऊचल जाहीर

कारखान्याकडून स्वाभिमानी शेतकरी संघटनेला आंदोलन थांबवण्याचे व ऊस देऊन सहकार्य करण्याचे आवाहन

संचार वृत्त अपडेट 

ओंकार साखर कारखाना ऊसास ३१५0/-रू.एकून दर देणार असून पहिला हाप्ता 30५0/-रु. तर दिपालीसाठी १00 रूपये बाबुरावजी बोञे पाटील
ओंकार साखर कारखाना(ता.माळशिरस)परिवाराचे चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील यांनी 202५ व 202६या गळीत हंगामाच्या शुभारंभला ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसास जिल्ह्य़ात उच्चांकी भावाची परंपरा कायम ठेवणार आसा शब्द शेतकऱ्यांना दिला होता. तो शब्द खरा केला ऊसाची पहिली उच्चल 30५0/-रु. तर दिवाळी सणासाठी १00 रूपये देण्यात येणार आहेत. आशी माहिती ओंकार परिवाराचे चेअरमन बाबुराव बोञे पाटील यांनी दिली.
ओंकार परिवाराचे चेअरमन बाबुरावजी बोञे पाटील संचालक प्रशांतराव बोञे पाटील यांनी
सोलापूर जिल्ह्य़ातील बंद अवस्थेत असणारे साखर कारखाने अङचणीवर मात करून चालु केले. शेतकरी कर्मचारीवर्ग यांना विश्वास दिला की तुमच्या श्रमाला योग्य तो दाम दिला जाईल. त्या प्रमाणे गत वर्षीच्या ऊसास जिल्ह्य़ात उच्चांकी दर दिला.202५ व 202६ या सिझनाचा ऊसाचा दर ३१५0 दर जाहीर केला या वेळी जनरल मॅनेजर सर्व खाते प्रमुख उपस्थित होते. उच्चांकी दर जाहीर केल्या बद्दल ऊस उत्पादक शेतकरी बाबुरावजी बोञे पाटील ग्रामविकास प्रतिस्ठानच्या वतीने बोञे पाटील यांचे अभिनंदन करण्यात आले. कारखाना प्रशासनाकडून ऊस उत्पादकांना ऊस देऊन सहकार्य करण्याचे आव्हान करण्यात आले आहे.

कांहीं दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करण्याचा इशारा निवेद्यनाद्वारे कारखाना प्रशासनास दिला होता. यावेळी कारखान्याकडून लवकरच दर जाहीर करू असे लेखी आश्वासन कारखान्याने संघटनेला दिले होते. कारखाना प्रशासनाने आज दि.८/१२/२५. रोजी लेखी पत्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माळशिरस तालुका अध्यक्ष अजित बोरकर यांना देऊन दर जाहीर केला आहे. आंदोलन थांबवून कारखान्यास ऊस देऊन सहकार्य करण्याचे आव्हान कारखाना प्रशासनाच्या वतीने संघटनेला करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button