solapur

ऊस दर मिळावा , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलनाचे नियोजन

ऊस दर मिळावा , स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे आंदोलनाचे नियोजन

संचार वृत्त अपडेट 

स्वाभिमानी शेतकरी संघटना माळशिरस तालुक्याच्या वतीने सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कारखाना या ठिकाणी शनिवार दि. 13/12/25 रोजी सकाळी १० वाजता कारखान्याच्या गेट समोर आंदोलन करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांचे हित लक्षात घेऊन आंदोलनाची दिशा ठरवली असून कारखान्याने 2850/- पहिला हप्ता जाहीर केला आहे. ही रक्कम तशी पुरेशी नाही. साखरेचे दर,उपपदार्थाचे उत्पन्न याचा विचार करता 3400/-रु.दर द्यावा अशी मागणी करत आहोत.असे संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून सांगण्यात येत आहे. ऊस उत्पादक,सभासद, शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बहुसंख्येने,पक्ष,पार्टी, गट,तट न बघता आंदोलनामध्ये सामील व्हावे असे आव्हान अजित बोरकर, भानुदास सालगुडे पाटील,अमरसिंह माने देशमुख,मगन काळे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button