solapur

महाळुंग श्रीपूर न.पं.मध्ये दोन महिन्यांनी मुख्याधिकारी व बांधकाम इंजिनिअर यांची उपस्थिती कारभारात पारदर्शकता नसल्याने सावळा गोंधळ कारभार रामभरोसे

महाळुंग श्रीपूर न.पं.मध्ये दोन महिन्यांनी मुख्याधिकारी व बांधकाम इंजिनिअर यांची उपस्थिती

कारभारात पारदर्शकता नसल्याने सावळा गोंधळ कारभार रामभरोसे

संचार वृत्त अपडेट 

श्रीपूर(प्रतिनिधी)–महाळुंग श्रीपूर नगरपंचायत मध्ये तब्बल दोन महिन्या नंतर नगरपंचायतचे प्रभारी मुख्याधिकारी व प्रभारी बांधकाम इंजिनिअर यांनी उपस्थिती राहिली आज नगरपंचायत मध्ये जनरल मिटिंग घेण्यात आली यामध्ये अनेक प्रलंबित कामे नविन विषयावर साधकबाधक चर्चा झाली दरम्यान नगरपंचायत कडे कंत्राटी सफाई कर्मचारी यांच्या जवळपास बारा ते चौदा महिने वेतन थकीत असल्याने ते कर्मचारी मुख्याधिकारी यांना समक्ष भेटायला आले तेव्हा उपस्थित एकाही नगरसेवकांनी या गोरगरीब दलित समाजातील कंत्राटी सफाई कर्मचारी यांच्या थकीत वेतनावर बोलले नाहीत सर्वजण मुग गिळून गप्प बसले होते तसेच नगरपंचायत चे माध्यमातून जी विकास कामे सुरू आहेत त्यावर काही नागरिकांनी व आरटीजीएस कार्यकर्ते यांनी निकृष्ट दर्जाची कामे सुरू असून या निकृष्ट कामाची योग्य पध्दतीने चौकशी करून संबंधित ठेकेदार यांच्या त्या कामांची चौकशी करावी अशी मागणी केली नगरपंचायत हद्दीत जे ठेकेदार नगरपंचायत चा ठेका घेऊन कामे करत आहेत ते निविदे प्रमाणे काम करत नाहीत तसेच रस्ते गटारी व अन्य विकास कामे कशा पध्दतीने थातुरमातुर केली जात आहेत याकडे लक्ष वेधले नगरपंचायत कडे स्वीपर म्हणून कंत्राटी पध्दतीने सार्वजनिक शौचालय सफाई काम करणारे संबंधित कर्मचारी यांचा चौदा महिन्याचे वेतन थकीत आहे तत्कालीन मुख्याधिकारी यांनी काही महिन्याचे वेतन काढले होते परंतु त्यानंतर दोन ते तीन प्रभारी मुख्याधिकारी यांनी पदभार स्वीकारला परंतु त्यांचे काळात या गरीब स्वीपर चे वेतन काढले जात नाही टाळाटाळ करुन त्याला हेलपाटे मारायला लागत आहेत कोणीही त्याची दखल घ्यायला तयार नाही तो बिचारा हेलपाटे मारुन थकला संबंधित अधिकारी कसलीही त्याला दाद देत नाहीत नगरपंचायत मध्ये सर्वसामान्य नागरिकांना कामासाठी गेलं तर काही कर्मचारी जबाबदार अधिकारी उद्धट बोलतात अपमान करतात मुख्याधिकारी यांच्या सह्या नसल्याने अनेक दिवस दाखले उतारे व कागदपत्रे मिळण्यास दिरंगाई होत आहे कचरा गाड्या ठराविक ठिकाणी दररोज येतात पण सार्वजनिक ठिकाणी रस्त्यावर साचलेला कचरा उचलला जात नाही त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी मुख्य चौकात कचरा ढिग साचले आहेत नगरपंचायत मध्ये आपल्या वार्डातील कामे होणे अपेक्षित असताना नगरसेवक दुर्लक्ष करतात जी कामे सुरू आहेत ती बंद कशी पडली जातील याकडे काही नगरसेवक कुरघोड्या करत असल्याचे काही नगरसेवक खाजगीत बोलताना ऐकायला मिळते नगरपंचायत ची कामे पारदर्शक पध्दतीने होत नसल्याने सावळागोंधळ सुरू असल्याची परिस्थिती आहे या सर्व पार्श्वभूमीवर मुख्याधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देऊन प्रशासकीय कारभार सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न करण्याची गरज आहे कंत्राटी सफाई कर्मचारी यांचे वेतन थकीत का आहे तर नगरपंचायत ची पाणी पट्टी घरपट्टी व इतर वसूली व्यवस्थीत होत नसल्याचे सांगण्यात येते नागरिकांना सर्व सुविधा दिल्या तर ते कर भरतील अशी परिस्थिती आहे एकंदरीत नगरपंचायत चा कारभार रामभरोसे आहे एवढे मात्र नक्की.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button