वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने कैलास भूमी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने कैलास भूमी येथे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न
संचार वृत्त अपडेट
संग्रामनगर (प्रतिनिधी)
अकलूज येथील वीरशैव लिंगायत समाज बांधव यांच्या वतीने नवीन वर्षाची सुरुवात लिंगायत समाज कैलास भूमी येथे श्रमदानातून वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या परिसरात विविध प्रकारची झाडे लावण्यात आली आहे.
सध्या वृक्षतोड मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे वीरशैव लिंगायत समाजातील युवकांनी नवीन वर्षाची सुरुवात वृक्षारोपणाने केल्यामुळे भावी पिढीला याचा लाभ होणार आहे.या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी अकलूज ग्रामपंचायतीचे माजी सदस्य त्र्यंबक (तात्या) गुळवे,वीरशैव लिंगायत समाज बहुउद्देशीय संस्थेचे खजिनदार आनंद (दादा) भिकलिंग तोडकरी,वीरशैव लिंगायत समाज बहुउद्देशीय संस्थेचे संचालक मल्लिकार्जुन (पिंटू) वैद्य देशमुख व सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर बिराजदार यांनी या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी विविध प्रकारची झाडे उपलब्ध करून दिली आहेत.

वृक्षारोपण कार्यक्रम अकलूज नगरपरिषदेचे नगरसेवक विलास गणपतराव क्षीरसागर, वीरशैव लिंगायत समाज बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष नागेश औदुंबर नष्टे, उपाध्यक्ष नितीन शंकरराव आर्वे, वीरशैव लिंगायत समाज मंडळाचे अध्यक्ष गोपाळ (राजाभाऊ) सोमनाथ गुळवे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.यावेळी मल्लिकार्जुन (पिंटू) वैद्य-देशमुख,पोलीस अधिकारी राजमाने,आनंद (दादा) तोडकरी,संतोष गुळवे,नागेश लिगाडे,सुजित बामनकर,डॉ.चंदन सरताळे
प्रभाकर बिराजदार,महालिंग राऊत
उमेश नडगिरे,महेश डिकोळे ओंकार बेलपत्रे पञकार,संजय लोहकरे,शशिकांत कडबाने उपस्थित होते.



