महाराष्ट्रातील दैतिप्यमान यशाबद्दल अकलूज येथे मोठ्या उत्साहात जल्लोष

महाराष्ट्रातील दैतिप्यमान यशाबद्दल अकलूज येथे मोठ्या उत्साहात जल्लोष
संचार वृत्त अपडेट
भाजप व महायुतीला महाराष्ट्रात दैत्यपमान यश संपादन केल्याच्या आनंद उत्सव माळशिरस व अकलूज येथे भाजप व महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात एकमेकांना लाडू भरून साजरा केला.यावेळी मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करून भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, वंदे मातरम,राम सातपुते तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है अशा घोषणाबाजी करून जल्लोष साजरा केला.
यावेळी अकलूजचे भाजप शहराध्यक्ष महादेव कावळे, निलेश रणवरे, अक्षय वायकर, सचिन शिंदे, गिरीराज माने पाटील, नगरसेवक महेश शिंदे, राहुल लोंढे,सरचिटणीस संतोष टकले, राजकुमार कुलकर्णी,विक्रम देशमाने, किसन शिंदे, सोमनाथ भोसले, सोमनाथ परदेशी, शहाबाद काजी, श्रावण खडके, अमित टिळेकर, संजय एकतपुरे,लहुजी कांबळे, बजरंग कांबळे, संतोष ताटे देशमुख, संजय खुडे, गणेश ननवरे, राहुल कटके, प्रवीण पठाडे, राहुल वाघमारे, अब्बास शेख, भैय्या कोरबू ,ई. कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी माळशिरस तालुक्यात जि.
प.पं.स.मध्ये आम्ही गुलाल उधळू
आजचा हा जल्लोष भारतीय जनता पार्टी व महायुतीला पूर्ण महाराष्ट्रामध्ये ८० टक्के बहुमत मिळाले आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मी खास अभिनंदन करतो जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एक हाती सत्ता सोलापूर येथे आणली.त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. यावेळी माळशिरस तालुक्यामध्ये सुद्धा पं. स. जि. प. मध्ये गुलाल उधळू असा विश्वास यावेळी माळशिरस येथे राम सातपुते यांनी व्यक्त केला.



